Nepal : नेपाळमध्ये मोठ्या घडामोडी सुरू आहेत. ‘जेन-झी’ने नेपाळमधील सरकारविरोधात सुरू केलेल्या निदर्शनांनी मोठ्या प्रमाणात उग्र स्वरूप धारण केलं आहे. त्यानंतर अखेर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. निदर्शकांचा संताप एवढा होता की निदर्शकांनी पार्लमेंटसह अनेक महत्त्वाच्या इमारतींची जाळपोळ केली. नेपाळची संसद, सर्वोच्च न्यायालय आणि इतर महत्त्वाच्या इमारतींना आग लावली. अखेर के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आणि नेपाळमधील परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अशा परिस्थितीत नेपाळमध्ये काही भारतीय यात्रेकरू अडकल्याची माहिती समोर आली आहे. शेकडो कैलास मानसरोवर यात्रेकरूंना परत मायदेशी परतण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाची मदत हवी आहे. दरम्यान, त्रिशूर येथील डॉ. सुजय सिधान हे कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले होते. मात्र, सिधान यांना अशी अपेक्षा नव्हती की ते शेकडो भारतीय यात्रेकरूंबरोबर निदर्शनांमुळे तिकडे अडकतील.

शेकडो कैलास मानसरोवर यात्रेकरूंनी परिक्रमा पूर्ण केली तेव्हा नेपाळमध्ये परिस्थिती आणखी बिकट झाली होती. जिथे तरुणांच्या नेतृत्वाखालील चळवळीने सरकार पाडले. त्यामुळे सीमा बंद करण्यात आल्या. तिबेट प्रदेशात ६,००० मीटर उंचीवर कैलास पर्वताच्या अगदी समोर डार्चेनमध्ये राहण्याची व्यवस्था ऑक्सिजन आणि वैद्यकीय सुविधांची कमतरता आहे. आता अंदाजे २००० यात्रेकरू पुन्हा परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या यात्रेकरूंच्या परतीची सोय करण्याबाबत सूत्रांनी सांगितलं की बीजिंगमधील भारतीय स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. दरम्यान, तेथील परिस्थितीबाबत बोलताना पुढे काय होईल माहित नाही’, असं सिधान यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

सुजय सिधान म्हणाले की, “शेकडो भारतीय नागरिक नेपाळमध्ये अडकल्याबाबत आणि विमानतळ बंद झाल्याबद्दल बोलत आहेत. मात्र, डार्चेनमध्ये २,००० हून अधिक भारतीय नागरिक अतिशय वाईट परिस्थितीत अडकले आहेत. ज्यांना परत आणण्याची आवश्यकता आहे. कारण त्यापैकी अनेकजण वृद्ध आहेत. चीनशी झालेल्या करारानुसार, भारताने या वर्षीपासून यात्रा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आणि सरकारी संस्थांद्वारे ७५० यात्रेकरूंना सिक्कीम आणि उत्तराखंड मार्गे दोन नियुक्त मार्गांनी नेले होते. मात्र, सिधान यांच्या सारख्या हजारो लोकांनी खासगी टूरशी करार केला. त्या मार्गानुसार ते नेपाळमधील नेपाळगंज येथे जातात आणि तेथून ते नेपाळमधील हिल्साला लहान विमानांनी जातात.

हेलिकॉप्टर त्यांना हिल्सा येथून परिक्रमेचा प्रारंभ बिंदू असलेल्या डार्चेन येथे घेऊन जातात, ते त्याच मार्गाने परत येतात. पण आता या यात्रेकरूंना नेपाळ ओलांडून त्याच मार्गाने परत न जाता भारतात परतण्याचा मार्ग नाही. मंगळवारी त्यांना नवी दिल्लीतील भारतीय अधिकाऱ्यांकडून काही फोन आले. पण त्यानंतर पुन्हा संपर्क झाला नसल्याचं ते म्हणतात. “आम्हाला परतण्याची सोय करण्यासाठी आम्ही आता परराष्ट्र मंत्रालयाकडून मदतीची अपेक्षा करत आहोत”, असं सुजय सिधान यांनी म्हटलं आहे.