भारतातून अमेरिकेत नोकरीसाठी जाऊन तिथे स्थायिक होऊ पाहणाऱ्या ट्रम्प प्रशासनाने दणका देण्याच्या तयारीत आहे. एच १ बी व्हिसाचे नूतनीकरण न झाल्यास व्हिसाधारकाला थेट मायदेशी पाठवण्याची तरतूद असलेले धोरण लागू झाले आहे. यामुळे अमेरिकेतल्या भारतीयांची डोकेदुखी वाढली आहे. चेंज ऑफ स्टेटससाठी करण्यात आलेला अर्ज फेटाळण्यात आला तर त्या व्यक्तीवर देशातून हद्दपार करण्याची कारवाई होणे शक्य आहे.
व्हिसा नसल्यास अमेरिकेत काम करणाऱ्या व्यक्तीला नोकरी गमावण्याचीही वेळ येऊ शकते. तसेच अशा व्यक्तीचे अमेरिकेतले वास्तव्यही बेकायदेशीर असणार आहे. अशा परिस्थितीत इमिग्रेशन कोर्टाच्या निर्णयापर्यंत त्या व्यक्तीला काही महिने अमेरिकेत काढावे लागू शकतात. तसेच एनटीए अर्थात नोटीस टू अपिअर बजावल्यानंतर कोर्टापुढे न आल्यास अमेरिकेत पुन्हा प्रवेश मिळवण्यासाठी थेट ५ वर्षांची बंदी केली जाऊ शकते.
काय आहे H1 B व्हिसा?
सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगसारख्या कामात प्रावीण्य असलेल्या परदेशी व्यक्तींना एच १ बी व्हिसा जारी केला जातो. नोकरदाराच्या वतीने इमिग्रेशन विभागाकडे यासाठी अर्ज द्यावा लागतो. अमेरिकेची माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी त्यांच्या कार्यकाळात ही व्यवस्था सुरु केली. उच्च स्तरिय कुश व्यावसायिकांना नियुक्त करण्यासाठी अमेरिकन कंपन्या एच १ बी व्हिसाचा वापर करतात. आऊटसोर्सिंग फर्मना हा व्हिसा दिला जातो. मागील वर्षी अमेरिकेत एच १ बी व्हिसासाठी २ लाखांपेक्षा जास्त अर्ज आले होते.