नवी दिल्ली : गुंड टोळय़ा, दहशतवादी गट आणि अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळय़ा यांच्यातील साटेलोटे शोधून काढण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी आठ राज्यांतील अनेक ठिकाणांवर छापे टाकून शोधमोहीम राबविली. दिल्लीतील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

 हे छापे दिल्ली. महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात टाकणात आले. सध्या पाकिस्तानात असलेला हरविंदरसिंग संधू ऊर्फ रिंदा याला भारत सरकारने दहशतवादविरोधी कायद्याखाली काही दिवसांपूर्वी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. त्याच्याशी संबंधित तसेच अन्य प्रकरणांच्या तपासासाठी हे छापे टाकण्यात आले आहेत. भारत तसेच परदेशातील काही गुंड टोळय़ा निधी जमा करून दिल्ली आणि देशात अन्य भागांत दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी तरुणांची भरती करीत आहेत. काही विशिष्ट व्यक्तींची हत्या घडविण्याचा त्यांचा हेतू आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने नोंदविलेले गुन्हे आता एनआयएकडे वर्ग करण्यात आले आहेत.

७६ ठिकाणी शोध 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूण ७६ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. दिल्ली, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात ही कारवाई झाली. त्यात सुमारे दीड कोटींची रोख हस्तगत करण्यात आली. शिवाय ११ पिस्तुले, रायफलींसह दारूगोळाही जप्त करण्यात आला. आक्षेपार्ह साहित्य ताब्यात घेण्यात आले. या पैकी तीन प्रकरणे गेल्या ऑगस्टमध्ये एनआयएने नोंदवली होती.