पीटीआय, मदुराई (तमिळनाडू)

तमिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकावर सायिडगला ठेवलेल्या रेल्वेच्या एका डब्याला शनिवारी पहाटे आग लागल्याने रामेश्वरमला जाणाऱ्या नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला. ते सर्व उत्तर प्रदेशातील होते आणि तीर्थयात्रेला जात होते. या दुर्घटनेत २० जण जखमी झाले आहेत.

Unauthorized sale of food,
महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये अनाधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री, सहा विक्रेत्यांना अटक
Death of a passenger, Shahapur,
टिटवाळा येथे लोकल हल्ल्यातील शहापूर जवळील प्रवाशाचा मृत्यू, दोन हल्लेखोरांना अटक, दोन जण फरार
thane, train, Mumbra-Kalwa,
ठाण्यापल्ल्याडील रेल्वे प्रवास धोक्याचा, मुंब्रा – कळवा दरम्यान दोन वर्षांत ३१ जणांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू
Dombivli, poultry farm, Kopar railway station
डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकालगत हरितपट्ट्यात कोंबड्यांचा खुराडा, रेल्वे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी

नागरकोइल जंक्शन येथे २५ ऑगस्ट रोजी पुनलूर-मदुराई एक्स्प्रेसला जोडलेला हा खास आरक्षित डबा वेगळा करून मदुराई रेल्वे स्थानकावर उभा करण्यात आला होता. या डब्यात प्रवाशांनी अवैधरित्या गॅस सिलिंडर आणले होते. त्यामुळेच आग लागली, अशी माहिती दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या डब्यातील प्रवासी तीर्थयात्रेला निघाले होते. नऊ मृतांपैकी सहा जणांची ओळख पटली आहे. त्यापैकी तीन पुरुष आणि तीन महिला आहेत, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. मदुराईचे जिल्हाधिकारी एम. एस. संगीता यांनी सांगितले की, रेल्वेच्या डब्याला लागलेल्या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत.