बिहारचे मुख्यमंत्री आणि जद(यू)चे नेते नितीशकुमार यांना नवाडा येथील एका जाहीर सभेत उपस्थितांपैकी काही जणांनी चप्पल दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जयघोषाच्या घोषणा दिल्याने खळबळ माजली आहे.
जद(यू)चे उमेदवार आणि विद्यमान आमदार प्रदीपकुमार यांच्या प्रचारासाठी वरसालीगंज येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या वेळी एका गटाने नितीशकुमार यांना चप्पल दाखविली.
मोदी यांच्या जयघोषाबरोबरच या गटाने नितीशकुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. मात्र यामुळे विचलित न होता नितीशकुमार यांनी आपले भाषण पूर्ण करून सरकारने केलेली विकासकामे जनतेसमोर मांडली. चप्पल दाखविण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार नितीशकुमार यांचे भाषण संपेपर्यंत सुरू होता, मात्र या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू करण्यात येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
नितीशकुमार यांना सभेवेळी यापूर्वीही विरोध करण्यात आले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांनीही काही महिन्यांपूर्वी विरोध केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar shown slippers at election rally
First published on: 30-09-2015 at 06:03 IST