दक्षिण मिझोराममधील लवंगतलाई जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात गेल्या सलग तीन वर्षांत एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही, अशी माहिती येथील पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी दिली़  लुंगलेई येथे पोलीस उपमहानिरीक्षक एल़  एच़  शांलिएना यांच्या अध्यक्षतेखाली गुन्हे परिषदेचे आयोजन करण्यात आले होत़े  या वेळी ही माहिती देण्यात आली़
लवंगतलाई जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्गम जिल्ह्यातील गुन्ह्याचा दर फारच कमी आह़े  या भागातील बोरापांसुंद्री या पोलीस ठाण्यात तीन वर्षांत एकाही गुन्ह्याची नोंद झालेली नाही़  मिझोरमच्या दक्षिण भागात लुंगलेई, लवंगतलाई आणि बया जिल्ह्यांचा समावेश होतो़  या भागात उत्तर मिझोरमच्या तुलनेत गुन्ह्याचा दर अगदीच नगण्य आह़े
लुंगलेई जिल्ह्यातील थिंगसाई पोलीस ठाण्यातही गेल्या वर्षभरात केवळ एकच गुन्हा दाखल झाला आह़े  तसेच बुंघमुन, फुरा आणि वसेईतलांग या पोलीस ठाण्यांतही वर्षभरात चारपेक्षा कमी गुन्हे दाखल झाले आहेत़  २०१३ या वर्षांत लुंगलेई जिल्ह्यात १५४, तर लवंगतलाई आणि सैहा या जिल्ह्यांत अनुक्रमे ९० आणि ६७ गुन्हे दाखल झाले आहेत़