भारतीय लष्कराने म्यानमारच्या भूमीत कारवाई करत २० अतिरेक्यांना ठार केल्याने भारतात कौतुकाला उधाण आले खरे, मात्र चोवीस तासातच म्यानमारने या वृत्ताचे खंडन केले. ही कारवाई आमच्या नव्हे तर भारतीय भूभागातच झाल्याचा दावा म्यानमार अध्यक्षीय कार्यालयाच्या संचालकांनी केला आहे.
रॅम्बो राठोडना रोखा
म्यानमार अध्यक्षीय कार्यालयाचे संचालक झाव हटय यांनी याबाबतचा गौप्यस्फोट आपल्या फेसबुक खात्यावर केला आहे. त्यांनी यात म्यानमार लष्कराचा हवाला देत भारतीय लष्कराने आपल्या हद्दीत न येता भारत- म्यानमार सीमेवरच ही कारवाई केल्याचे म्हटले आहे. अर्थात शेजारी राष्ट्रांविरोधातील कारवायांसाठी आम्ही आमचा भूभाग कोणत्याही बंडखोरांना कधीच वापरू देणार नाही, असेही म्यानमारने स्पष्ट करीत भारताच्या दहशतवादविरोधी लढय़ाला पाठिंबाच दिला आहे.
म्यानमारमधील कारवाईचा निर्णय असा झाला..
दरम्यान, भारतीय लष्कराने म्यानमारमध्ये आणखी कारवाया करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल पुढील रणनीती ठरविण्यासाठी म्यानमारला जाणार आहेत. भारताबाहेर अतिरेक्यांचे आणखी २० तळ आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे लष्कराचे मनसुबे आहेत. यासाठी भारताने प्रयत्न चालविले असून म्यानमारमधील भारतीय राजदूत गौतम मुखोपाध्याय यांनी बुधवारी भारताने केलेल्या कारवाईबाबत चर्चा करण्यासाठी म्यानमार सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2015 रोजी प्रकाशित
आमच्या भूभागात कारवाई नाहीच : म्यानमारचा दावा
भारतीय लष्कराने म्यानमारच्या भूमीत कारवाई करत २० अतिरेक्यांना ठार केल्याने भारतात कौतुकाला उधाण आले खरे, मात्र चोवीस तासातच म्यानमारने या वृत्ताचे खंडन केले.

First published on: 11-06-2015 at 06:08 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No indian armys operation takes place in myanmar