उत्तर कोरियाने अमेरिकेसाठी नियुक्त केलेले विशेष दूत किम होक चोल यांच्यासह पाच अधिकाऱ्यांना देहदंडाची शिक्षा दिली. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांच्यातील दुसरी परिषद अयशस्वी ठरली. त्याची शिक्षा म्हणून पाच अधिकाऱ्यांना गोळया झाडून मारण्यात आले. दक्षिण कोरियन वृत्तपत्र चोसन इल्बोने हे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किम जोंग उन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात हानोई येथे झालेल्या परिषदेसाठी किम होक चोल यांनी पूर्वतयारी केली होती. ते किम जोंग उन यांच्यासोबत परिषदेसाठी खासगी ट्रेनमधून गेले होते. सर्वोच्च नेत्याचा विश्वास घात केल्याच्या आरोपाखाली उत्तर कोरियाच्या पथकाने त्यांची गोळया झाडून हत्या केली.

किम होक चोल यांच्यासह परराष्ट्र मंत्रालयाच्या चार अधिकाऱ्यांना मार्च महिन्यात मीरीम विमानतळावर गोळया झाडून संपवण्यात आले. अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने वर्तमानपत्राने ही माहिती दिली आहे. अन्य अधिकाऱ्यांची नावे समजलेली नाहीत. आंतर कोरीयन संबंधांचा विषय हाताळणाऱ्या दक्षिण कोरियाच्या एकीकरण मंत्रालयाने या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी दक्षिण कोरियन वर्तमानपत्राने उत्तर कोरियातील देहदंडासंबंधी दिलेल्या बातम्या नंतर चुकीच्या ठरल्या होत्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: North korea executed five officials after failed donlad trump kim jong un summit
First published on: 31-05-2019 at 16:43 IST