ऑल इंडिया रेडिओ (AIR) अर्थात ‘आकाशवाणी’ आता जपान, जर्मनी आणि अन्य देशांत आपली सेवा सुरु करणार आहे. अनिवासी भारतीयांना आकाशवाणीचा उपयोग व्हावा हा या सेवेमागील भारत सरकारचा मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे. कॅनडा, दक्षिण अफ्रिका आणि मालदिव या देशांमध्येही आकाशवाणीचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आकाशवाणीतील वरिष्ठ अधिकारी अमलनज्योती मुझुमदार यांनी ‘पीटीआय’ला दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या बाह्य प्रसारण विभागाकडून (ईएसडी) १५० देशांत २७ भारतीय भाषांमध्ये आकाशवाणीची सेवा दिली जात आहे. यांपैकी १४ भाषांमध्ये शेजारील देशांत तसेच दक्षिण-पूर्व आशियातील देशांना सेवा पुरवण्यात येणार आहे. यापुढे अनेक देशांत आकाशवाणीच्या सेवांचा विस्तार करण्याचे ध्येय ठेवल्याचे मुझुमदार यांनी सांगितले. तसेच आकाशवाणी जपान, कॅनडा, जर्मनी, दक्षिण अफ्रिका, मालदीव आणि इतर काही राष्ट्रकुल देशांत नव्या सेवा सुरु करणार असल्याचे मुझुमदार यांनी सांगितले. नुकताच आकाशवाणीचा हा प्रस्ताव बाह्य प्रसारण विभागाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चेसाठी ठेवण्याता आला होता.

नुकतेच भारत दौऱ्यावर आलेले जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांनी म्हटले होते की, भारत हा विविध क्षेत्रांत गुंतवणूक वाढवत आहे. त्यामुळेच जपानलादेखील आकाशवाणीची गरज आहे. पाकिस्तान आता अफ्रिकन देशात आपल्या रेडिओ सेवांचे अस्तित्व वाढवत आहे याकडेही त्यांनी भारताचे लक्ष वेधले होते.

भारताचे वैशिष्ट्य श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ईएसडीचा हा प्रयत्न आहे. याद्वारे विविध प्रश्न, देशातील व्यवसायाच्या संधी, शिक्षणातील संधी, आरोग्य आणि पर्यटनाच्या संधी जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आकाशवाणीचा हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now listen to all india radio even in japan germany south africa and canada
First published on: 01-10-2017 at 16:20 IST