अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनएसए) गुगल व सॅमसंगच्या अ‍ॅप स्टोअरमधून माहिती चोरण्याची योजना आखली होती , त्यासाठी स्मार्टफोनमध्ये स्पायवेअर सोडण्याचा इरादा होता. एनएसए या अमेरिकी संस्थेच्या काही कागदपत्रांवरून  हे उघड आले आहे, या संस्थेचा कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन याने ही कागदपत्रे हस्तगत केली होती.
‘द इंटरसेप्ट’ एका ऑनलाइन वृत्त संकेतस्थळावर अमेरिकी गुप्तचर संस्थेने ब्रिटन, कॅनडा, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांच्या मदतीने फाइव्ह अलायन्स ही आघाडी तयार केली असून त्यांच्या मदतीने स्पायवेअर तयार केले जात आहे. राष्ट्रीय सुरक्षा संस्था म्हणजे एनएसएचे कंत्राटदार एडवर्ड स्नोडेन याने जी कागदपत्रे फोडली होती त्यावर आधारित वृत्तात म्हटले आहे, की स्मार्टफोनवर लक्ष ठेवण्यासाठी ही योजना आखली होती. या योजनेवर २०११ व २०१२ मध्ये गुप्तचर सेवेच्या बैठकांमध्ये चर्चा झाली होती. इरिटंट हॉर्न असे या योजनेचे नाव होते, त्यात माहिती स्मार्टफोनच्या अ‍ॅप स्टोअर्समधून चोरण्याचे ठरले होते व त्यासाठी माहिती चोरू शकेल असे सॉफ्टवेअरही वापरले जाणार होते, स्पायवेअरच्या माध्यमातून गोंधळात टाकणारे संदेश पाठवून माहिती चोरण्याचे ठरले होते. अरब देशांप्रमाणे आणखी एक अरब स्प्रिंग आंदोलन घडेल किंवा असलेले आंदोलन पसरेल अशी भीती त्या वेळी अमेरिकेला वाटत होती. आफ्रिका, सेनेगल, सुदान व काँगो यांची माहिती चोरण्यात त्यांना रस होता, पण फ्रान्स, क्युबा व मोरोक्रो, बहामाज, नेदरलँड्स, रशिया यांच्या अ‍ॅप स्टोअर सव्‍‌र्हर्सवरही डोळा होता. त्या वेळी गुगल अ‍ॅप स्टोअरला अँड्रॉइड मार्केट म्हटले जात असे. अलिबाबा ग्रुपच्या युसी ब्राऊजरमध्ये अनेक उणिवा लक्षात आल्या होत्या व तो ब्राऊजर भारत-चीनमध्ये लोकप्रिय होता. जगात ५० कोटी लोक तो वापरत होते. कॅनडातही सीबीसी न्यूजने एनएसएची ही कागदपत्रे प्रसिद्ध केली आहेत. संशयित अतिरेकी व इतर गुप्तचरांची माहिती मिळवणे, त्यांची ऑनलाइन माहिती पाहणे, सिमकार्ड नंबर, डिव्हाईस आयडी व स्मार्टफोनचे ठिकाण माहिती करून घेणे
हे उद्देश त्यात होते. परदेशी लष्करी यंत्रणा या युसी ब्राऊजरचा वापर पाश्चिमात्य देशात गुप्त कारवायांसाठी करीत असत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onएनएसए
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nsa planned to hijack google app store to hack smartphones
First published on: 23-05-2015 at 02:30 IST