अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध छेडलेल्या युद्धाचा शेवटचा टप्प्यातील आठवडी भेट म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अफगाणिस्तानातील एका प्रांताला गुप्त भेट दिली. ही भेट शनिवारी मध्यरात्री दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमेरिकन हवाई दलाचे एक विमान बगराम हवाई तळावर मध्यरात्री उतरले. हे विमान वॉशिंग्टनवरून निघाले होते. या वेळी ओबामा यांनी काही तास येथे घालवले. या वेळी अफगाणिस्तानचे राष्ट्रध्यक्ष हमीद करझाई यांना भेटण्यासाठी काबुलकडे प्रयाण करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
या नेत्यांमधील सलोख्याने संबंध संपुष्टात आले असून करझाई हे ओबामा यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. ओबामा यांना अफगाणिस्तानात मोजकेच सैन्य ठेवायचे आहे. यासाठी यंदा अमेरिका आणि नाटो सैन्याच्या अनेक फौजा मागे घेण्यात आल्या आहेत.