भविष्यातील कुठलेही युद्ध स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांनी जिंकण्याच्या टप्प्प्यापर्यंत पोहोचण्याचे भारताचे लक्ष्य आहे असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी गुरुवारी सांगितले. इंडियन एअर फोर्ससाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून ८३ मार्क-१ ए तेजस फायटर विमाने विकत घेण्याच्या व्यवहाराला मंत्रिमंडळ समितीने काल मंजुरी दिली. हा सर्व व्यवहार ४८ हजार कोटी रुपयांचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा निर्णय केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला बळकटी देणारा आहे. त्यानंतर आज बिपिन रावत यांनी हे विधान केले. “स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठिंबा देण्यावर आमचा भर असेल” असे रावत यांनी सांगितले. “मेड इन इंडिया इंजिनसह विमानातील सर्व महत्त्वाचे भाग स्वदेशी असतील आणि अशा विमानाने आमची एअर फोर्स गगनाला स्पर्श करताना आम्हाला पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे” असे बिपिन रावत म्हणाले.

काय आहे करार?
इंडियन एअर फोर्ससाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून ८३ मार्क-१ ए तेजस फायटर विमाने विकत घेण्याच्या व्यवहाराला मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. तेजस हे स्वदेशी बनावटीचे फायटर विमान आहे.

फेब्रुवारी महिन्यात करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर तीन वर्षांनी ‘तेजस मार्क-१ ए’ विमानांचा पुरवठा सुरु होईल. आयएएफने हिंदुस्तान एरोनॉटिक्सला आधीच ४० ‘तेजस मार्क १’ विमानांची ऑर्डर दिली आहे. नवे ‘तेजस मार्क-१ ए’ आधीच्या ‘तेजस मार्क १’ पेक्षा अधिक अत्याधुनिक आणि घातक असणार आहे. तेजसच्या नव्या आवृत्तीत ४३ बदल करण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Objective is to win future conflicts with homemade weapons cds rawat dmp
First published on: 14-01-2021 at 20:14 IST