अमेरिकेतल्या इंधनसाठ्यात सलग सहाव्या आठवड्यात घट झाल्यानंतर इंधनाचे मासिक आणि तिमाही भाव बुधवारी वाढले आहेत. OPEC या इंधन निर्यातदारांच्या संघटनेच्या सांगण्यानुसार या वर्षाच्या उर्वरीत महिन्यांमध्येही इंधनपुरवठा कमी करण्याचे सूतोवाच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑगस्टमधला ब्रेंट क्रूडचे करार काल संपुष्टात आला. त्यानुसार इंधनाचे दर एका बॅरलमागे ०.५ टक्क्यांनी वाढून ७५.१३ डॉलर्सवर थांबले. सप्टेंबरचे करारही ३४ सेंट्सनी वाढल्याने हा भाव आता प्रति बॅरल ७४.६२ डॉलर्सवर स्थिरावला आहे. अमेरिकेतील वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या तेलाचा भाव प्रति बॅरल ४९ सेंट्सनं किंवा ०.७ टक्क्यांनी वाढून ७३.४७ डॉलर्स इतका झाला आहे. हे दोन्हीही निर्देशांक २०१८ मधल्या सर्वाधिक दराच्या अगदी जवळ आहेत. गेल्या आठ महिन्यातल्या सात महिन्यांत इंधनाच्या दरांत सलग वाढ झालेली आहे. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटच्या दरामध्ये जून महिन्यात १० टक्क्यांनी वाढ झाली तर ब्रेंटच्या दरांमध्ये ८ टक्क्यांची वाढ झाली.

हेही वाचा- सर्वसामान्यांना महागाईचा फटका! एलपीजीच्या दरात वाढ, घरगुती अनुदानित सिलेंडर २५ रुपयांनी महागला

रॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणामध्ये हे समोर आलं आहे की ब्रेंटचा या वर्षातला सरासरी भाव ६७.४८ डॉलर्स प्रति बॅरल इतका राहील तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचा सरासरी भाव ६४.५४ डॉलर्स राहील. हे दोन्हीही दर मे महिन्यातल्या सर्वेक्षणापेक्षा वाढलेले दिसतात.

वाढत्या मागणीमुळे तेल उत्पादकांनी पुरवठा वाढवला असला तरी अमेरिकेतील इंधनसाठ्यात सलग सहाव्या आठवड्यात घट झाली असल्याचं समोर येत आहे.

हेही वाचा- खाद्यतेल स्वस्त होणार; केंद्राने घेतला महत्त्वाचा निर्णय

वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटला जिथून तेलाचा पुरवठा होतो त्या कुशिंगमध्ये मार्च २०२० पासूनचा सर्वात कमी साठा सध्या आहे. कुशिंगच्या तेल कारखान्यांमध्ये कमी असलेला साठा आणि OPEC राष्ट्रांची उद्या होणारी बैठक याचा विचार करता इंधनाचे भाव उद्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण, पुरवठ्यापेक्षा मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, असा अंदाज ह्युस्टनमधल्या लिपो ऑइल असोसिएट्सचे अध्यक्ष अँड्र्यू लिपो यांनी वर्तवला आहे.

OPEC राष्ट्रांच्या या बैठकीत तेलपुरवठ्यातील कपात एप्रिल २०२२ नंतरही सुरू ठेवावी का यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा पुरवठा कमी होण्याची भीती असली तरी OPEC समूहाची तेलकपात थांबवल्यानंतर आशादायी चित्र असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oil rises on lower us stockpiles demand recovery opec meeting organized today vsk
First published on: 01-07-2021 at 17:03 IST