उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी असणाऱ्या एका ७२ वर्षीय वृद्धाबरोबर एक विचित्र प्रकार घडला आहे. ‘मॅजिक मिरर’ अर्थात लोकांना नग्न दाखवणारा आरसा विकत देण्याच्या बहाण्याने संबंधित वृद्धाला नऊ लाखांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत पश्चिम बंगालमधील तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

पार्थ सिंगरे (वय-४६, रा. संत्रागाची), मोलया सरकार (वय-३२, रा. उत्तर २४ परगणा) आणि सुदिप्ता सिन्हा रॉय (वय-३८, रा. कोलकाता) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. संबंधित आरोपींनी आपण सिंगापूर येथील एका बड्या कंपनीचे कर्मचारी असल्याचं भासवलं होतं. आरोपींनी तक्रारदाराला ‘लोकांना नग्न दाखवणारा मॅजिक आरसा’ देण्याचं आमिष दाखवलं होतं. संबंधित आरशाची किंमत दोन कोटी असल्याचं सांगत आरोपींनी पीडित व्यक्तीकडून नऊ लाख रुपये अॅडव्हान्स घेतले होते.

हेही वाचा- VIDEO: घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलीवर ऑनकॅमेरा बलात्कार करण्याचा प्रयत्न, ६ जणांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपींनी मॅजिक आरसा घेण्यासाठी तक्रारदार वृद्धाला भुवनेश्वर येथे येण्यास सांगितलं. तत्पूर्वी एका हॉटेलमध्ये त्यांची भेटही झाली. पण या हॉटेलमधील भेटीनंतर आरोपी आपली फसवणूक करत आहेत, असं तक्रारदाराच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी आरोपींकडे पैसे परत देण्याची मागणी केली. पण आरोपींनी पैसे परत दिले नाहीत. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच ७२ वर्षीय वृद्धाने नयापल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास केला जात आहे.