उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीत झालेल्या उल्लेखनीय विजयानंतर आता लखनऊमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, योगी या आदित्यनाथ यांच्या बहीण म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर योगी एक दिवस पंतप्रधान होऊ शकतात. यासोबतच योगींच्या मेहुण्याने त्यांचा एक किस्सा सांगितला आहे.


योगी आदित्यनाथ यांची बहीण आणि त्यांचे मेहुणे योगींच्या शपथविधीच्या विषयावर ‘टाइम्स नाऊ नवभारत’ वाहिनीशी बोलत होते. यादरम्यान पत्रकाराने त्यांची बहीण शशी सिंह यांना योगी आदित्यनाथ यांच्या पुढच्या वाटचालीसंदर्भातला प्रश्न केला, तेव्हा त्यांनी सांगितले की, आता ते मुख्यमंत्री झाले आहेत आणि नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर तेही पंतप्रधान होऊ शकतात. हे सर्व फक्त मोदींच्या हातात आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.

jitendra awhad replied to sadabhau khot
सदाभाऊ खोतांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “लटकवलेली चावी जो नेतो….”
Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray in nagpur
फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”

हेही वाचा – योगी आदित्यनाथांचा ‘महा’शपथविधी; अंबानी, अदानीसह २०० हून अधिक VVIP येणार; १२ मुख्यमंत्र्यांचाही सहभाग


योगी यांच्या मेहुण्याने सांगितले की, आमच्या लग्नानंतर जवळपास २ वर्षे ते आमच्यासोबत आहेत. यासोबतच त्यांनी सांगितले की, योगी आदित्यनाथ यांना काही चुकीच्या गोष्टींचा राग यायचा आणि ते आम्हालाही फटकारायचे. गावात आमच्याकडून कुठलीही चूक झाली तर ते रोखायचे.

त्यांनी पुढे सांगितले की आमचे लग्न झाले तेव्हा योगी आदित्यनाथ बीएससी करत होते. ते त्यांच्या अभ्यासात व्यग्र होते त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्या मेव्हण्याने सांगितले की योगी आदित्यनाथ नेहमी म्हणायचे की तुम्ही ज्या गोष्टींमध्ये गुंतत आहात त्यामध्ये मी कधीही पडणार नाही. मी असे काहीतरी करेन ज्यामुळे आपले नाव संपूर्ण जगात पोहोचेल.