कर्नाटकच्या उत्तर कन्नडा जिल्ह्य़ात व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील सदस्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अश्लील मजकूर प्रसारित केल्याबद्दल त्याच्या ग्रुप अ‍ॅडमिनला अटक झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृष्णा सन्ना थम्मा नाईक असे अटक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो रिक्षा चालक असून त्याने ‘द बालसे बॉइज’ नावाने व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप तयार केला होता. त्यातील गणेश नाईक या सदस्याने ग्रुपवर मोदी यांच्या छायाचित्रासह अश्लील मजकूर प्रसारित केला. त्याबाबत मंजुनाथ नावाच्या व्यक्तीने मुर्डेश्वर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून कृष्णा नाईक याला माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अटक झाली आहे. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवले आहे. या प्रकरणातील बाळकृष्ण नाईक नावाचा अन्य आरोपी फरार आहे. पंतप्रधानांसंबंधी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिनला अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One person arrested due to modi criticism on whatsapp
First published on: 03-05-2017 at 02:31 IST