जम्मू-काश्मीमरधील अनंतनाग जिल्ह्यातील श्रीगुफवाडा येथे आज पहाटे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमकीस सुरूवात झाली असून, आतापर्यंत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. सीआरपीएफचे शीघ्र कृती दल, पोलीस व लष्कराच्या ३ राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये काल झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एके 47 रायफलसह स्फोटकं जप्त करण्यात आली होती. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोयबाच्या एका दहशतवाद्याचाही समावेश होता.

एलओसीच्या पलिकडे लाँचपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी असून ते भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती शनिवारी लष्कराकडून देण्यात आली होती. जम्मू काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना  लष्कराच्या जवानांकडून कंठस्नान घालण्यात आल्यानंतर  लष्कराकडून याबाबत माहिती देण्यात आली होती. दहशतवाद्यांकडून मॅगझिन, एक पिस्तुल, हातगोळे आणि दोन एके असॉल्ट रायफल्स जप्त करण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One unidentified terrorist killed in ongoing encounter at srigufwara area of anantnag msr
First published on: 13-07-2020 at 10:51 IST