वायएसआर काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांनी शुक्रवारी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांची भेट घेऊन आंध्र प्रदेशच्या विभाजनाला विरोध करण्याची मागणी केली.याबाबत आपण पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा करू आणि लवकरच निर्णय घेऊ, असे राजनाथ सिंग यांनी सांगितल्याचे जगनमोहन म्हणाले.
आंध्रच्या किनारपट्टी आणि रायलसीमा भागातील केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री आणि आमदारांची बैठक १६ फेब्रुवारीला मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांच्या निवासस्थानी हैदराबाद येथे बैठक होणार आहे. यामध्ये पुढील धोरण ठरवले जाणार आहे.