अन्न सुरक्षा विधेयक मंजूर करण्याच्या प्रक्रियेत विरोधी पक्ष अडथळे आणीत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता काबीज करण्यासाठी विरोधी पक्ष देशात अस्थिरतेची स्थिती निर्माण करीत असल्याचा आरोपही सोनिया गांधी यांनी केला आहे.
काही राजकीय पक्ष देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा पक्षांना प्रगती आणि विकास यांच्याशी काहीही देणेघेणे नाही. त्यांचा केवळ खुर्चीवर डोळा आहे आणि कोणत्याही स्थितीत त्यांना सत्ता काबीज करावयाची आहे. त्यामुळे अशा शक्तीविरुद्ध दक्ष राहण्याची गरज आहे, असेही सोनिया गांधी येथे एका मेळाव्याला संबोधित करताना म्हणाल्या.
अन्न सुरक्षा विधेयक मंजूर करण्याच्या प्रक्रियेत प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप अडथळे आणीत आहे. कोणालाही उपाशीपोटी झोपावे लागू नये, अशी आमची इच्छा असल्याने अन्न सुरक्षा विधेयक मंजूर करावयाचे आहे. मात्र विरोधक त्यामध्ये अडथळे आणीत आहेत. विरोधी पक्षांनी संसदेत यापूर्वी सहकार्य केले असते तर सदर विधेयक केव्हाच मंजूर झाले असते, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.
तथापि, यूपीए सरकारच्या जनहिताच्या योजना आणि कार्यक्रमांना विरोधी पक्ष नेहमीच विरोध करीत आला आहे, ही क्लेशदायक बाब आहे. काँग्रेसला ज्या गोष्टींमध्ये पुढाकार घ्यावासा वाटतो त्याला विरोधक विरोध करतात आणि आता त्यांची तशी सवयच झाली आहे, असेही त्या म्हणाल्या.
अन्न सुरक्षा विधेयक मंजूर करण्याच्या प्रक्रियेत प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप अडथळे आणीत आहे. कोणालाही उपाशीपोटी झोपावे लागू नये, अशी आमची इच्छा असल्याने अन्न सुरक्षा विधेयक मंजूर करावयाचे आहे. मात्र विरोधक त्यामध्ये अडथळे आणीत आहेत.