सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९३ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात यंदा ‘नोमडलँड’सिनेमाने बाजी मारली आहे. या सिनेमाने तीन पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं आहे. या सिनेमासाठी अभिनेत्री फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर क्लोई जाओ यांना दिग्दर्शनासाठी पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर ‘नोमडलँड’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार पटकावत 2021 सालातील ऑस्कर पुरस्कारावर नाव कोरलं आहे.
लॉस एन्जेलेसमध्ये हा सोहळा पार पडतोय. यावेळी करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन हा सोहळा व्हर्चुअल पद्धतीने पर पडतोय. युनियन स्टेशन आणि डॉल्बी थिएटर इथं हा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात ‘द प्रॉमिसिंग यंग वुमन’, ‘द फादर’, ‘नोमेडलँड’, ‘साऊंड ऑफ मेटल’ ‘जुडास अॅण्ड द ब्लॅक मसीहा’ या सिनेमांना वेगवेगळ्या श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेते अँथनी हॉपकिंस यांना ‘द फादर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर दक्षिण कोरियाच्या अभिनेत्री युन यू जंग यांना ‘मिनारी’ या सिनेमासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेता डॅनियेल कालूया याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे.
2021 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अभिनेता इरफान आणि अभिनेता भानु अथैया यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
अभिनेते अँथनी हॉपकिंस यांना 'द फादर' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.It's official! #Oscars pic.twitter.com/PAq8HGGo25— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
अभिनेत्री फ्रान्सेस मॅकडॉर्मंडने 'नोमाडलँड' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला.It's official! #Oscars pic.twitter.com/EgpWAZdKtW— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
‘नोमेडलँड’ या सिनेमाने 2021 च्या सर्वोत्कृष्ट पुरस्कारावर नाव कोरलं आहे. नोकरी गेल्यानंतर घराबाहेर पडून फिरायला निघालेल्या एका महिलेची कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. फ्रान्सिस मॅकडॉर्मंड हिने या सिनेमात या महिलेची मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका अशा एकूण सहा श्रेणीत नामांकन मिळालं आहे.
'जुडास अॅण्ड द ब्लॅक मसीहा' या चित्रपटातील 'फाइट फॉर यू' (Fight for You) या गाण्याला ऑस्कर प्रदान करण्यात आला आहे.
अभिनेता टायलर पेरी यांला 2021 सालातील ह्युम्यानिटेरियन पुरस्कार प्राप्त झाला आहे. टायलर पेरी उत्तम अभिनेत्यासोबतच दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेकख आहे.
'सोल' या चित्रपटाला ओरिजनल स्कोअर पुरस्कार मिळाला आहे. यंदाच्या ऑस्करमध्ये या चित्रपटाला मिळालेला दुसरा पुरस्कार आहे.
फिल्म् एडिटिंगसाठी 'साऊंड ऑफ मेटल' या सिनेमाला पुरस्कार मिळाला आहे. मिकल इ.जी निलसन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
'मँक' या सिनेमाला बेस्ट प्रॉडक्शन डिझाइनसाठी पहिला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. डोनाल्ड ग्रॅहाम बर्ट यांना प्रॉडक्शन डिझाइनसाठी हा पुरस्कार मिळाला आहे.
'टेनेट' या सिनेमाला बेस्ट व्हिज्युअल इफेक्टसाठी ऑस्कर प्रदान करण्यात आला आहे. 2020 सालातील 'टेनेट' हा सायन्स फिक्शन सिनेमा आहे. जो क्रिस्टोफर नोलन यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. ॲंड्र्यू जॅक्सन, डेव्हिड ली, ॲंड्र्यू लाकली आणि स्कॉट फिशर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
एरिक मेशर्समेंट यांना 'मँक' या चित्रपटासाठी बेस्ट सिनेमॅटोग्राफी या विभागात ऑस्कर मिळाला आहे.
दक्षिण कोरियाच्या अभिनेत्री युन यू जंग यांना 'मिनारी' या सिनेमासाठी सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
'सोल' चित्रपट ठरला वर्षातील सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट.
'कोलेत' या सिनेमाने बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट सब्जेक्ट या पुरस्कारावर यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात नाव कोरलं आहे.
'माय ऑक्टोपस टीचर' या सिनेमाला बेस्ट डॉक्युमेंट्री फिचरसाठी ऑस्कर प्रदान करण्यात आला आहे. पिप्पा एरलिच आणि जेम्स रीड यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.
'इफ एनीथिंग हॅपन्स आय लव्ह यू' या सिनेमाने बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे.
जेमी बक्ष्ट, निकोलस बेकर, फिलिप ब्लाध, कार्लोस कोर्टेस आणि मिशेल कोटोलेंक यांना बेस्ट साऊंड पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 'साऊंड ऑफ मेटल' या सिनेमासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
ट्रॅव्हन फ्री आणि मार्टिन डेसमंड रो यांना 'टू डिस्टेंस स्ट्रेंजर'साठी सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म पुरस्कार मिळाला आहे.
अनेक पुरस्कार पटकावलेल्या ‘नोमेडलँड’ या सिनेमाच्या दिग्दर्शिका क्लोई जाओ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या श्रेणीत पुरस्कार पटकावणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. It's official! #Oscars pic.twitter.com/UfflgqdTqF— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
अॅन रॉथ यांना 'मा रेनीज ब्लॅक बॉटम' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषाकारचा पुरस्कार मिळाला आहेIt's official! #Oscars pic.twitter.com/1vS4pgyBYj— The Academy (@TheAcademy) April 26, 2021
सर्जिओ लोपेझ-रिवेरा, मिया नियल आणि जमिका विल्सन यांना 'मिया रेनीज ब्लॅक बॉटम' या सिनेमसाठी सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइलचा पुरस्कार मिळाला आहे.
अभिनेता डॅनियेल कालूया याने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारावर नाव कोरलं आहे. 'जुडास अॅण्ड द ब्लॅक मसीहा' या सिनेमासाठी त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या श्रेणीत अभिनेता सॅचा बॅरन कोहेन यालादेखील 'ट्रायल ऑफ शिकागो 7' या सिनेमासाठी नामांकन मिळालं होतं. तर अभिनेता पॉल राची, लॅकेथ स्टॅनफील्ड आणि लेस्ली ओडम ज्युनिअर यांना देखील नामांकन मिळालं होतं.
'अनदर राऊंड' या डेन्मार्कमधील सिनेमाने सर्वोत्कृष्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म या पुरस्कारावर ऑस्कर सोहळ्यात नाव कोरलं आहे. थॉमस विंटरबर्ग यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. तर अभिनेता मॅड्स मिकेल्सन हे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
एमराल्ड फेनेलला 'द प्रॉमिसिंग यंग वुमन' या सिनेमासाठी ओरिजनल स्क्रीनप्लेसाठी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
क्रिस्तोफर हॅम्प्टन आणि फ्लोरियन झेलरने यांना 'द फादर' या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट रुपांतरीत स्क्रीनप्लेसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.
भारतीय वेळेनुसार हा सोहळा सोमवारी २६ तारखेला पहाटे ५.३०वाजल्यापासून सकाळी ८.३० वाजेपर्यंत चालेल. जगभरातल्या करोना प्रादुर्भावामुळे यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. हा सोहळा ऑस्करच्या ऑफिशिअल वेबसाईटवरुन oscars.com वरुन पाहता येणार आहे. तसंच ऑस्करच्या युट्युब चॅनेलवरुनही हा सोहळा पाहता येईल. अकॅ़डमीच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुनही हा सोहळा दाखवण्यात येणार आहे.