श्रीलंकेतील अतिरेकी संघटना एलटीटीईच्या एकेकाळी ताब्यात असणाऱ्या मन्नार भागात केलेल्या खोदकामात ८० मानवी मृतदेहांचे अवशेष सापडले आहेत़  त्यामुळे यादवी युद्धात तामिळ नागरिकांचे शिरकाण झाल्याच्या वादग्रस्त चर्चेला नव्याने तोंड फुटले आह़े
तज्ज्ञांच्या मतानुसार, ही सामूहिक कबर असून मृतावशेष एलटीटीईविरुद्धच्या सैनिकी कारवाईदरम्यान बेपत्ता झालेल्यांचे आहेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े  सर्व मृतदेह ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आल्याचे न्यायवैद्यक अधिकारी धनंजय वैद्यरत्ने यांनी सांगितल़े
न्यायालयीन चौकशीनंतर न्यायवैद्यक अधिकाऱ्यांना या भागात तैनात करण्यात आले आह़े  अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कबरीतील मृतावशेष अधिकतर स्त्रिया आणि मुलांचेच आहेत़  या लोकांना कसे मारण्यात आले हे उकलण्यासाठी आणखी काही चाचण्या करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल़े
मन्नार हा तामिळी अतिरेक्यांच्या ताब्यातील भाग होता़  त्यामुळे श्रीलंकेच्या सैन्याने हे हत्याकांड केले असल्याची शक्यता श्रीलंकेच्या शासनाने फेटाळून लावली आह़े