OYO New Rules for Unmarried Couples: भारतातील शहरात चांगले आणि किमान दर्जा असणारे हॉटेल शोधण्यासाठी ‘ओयो’ चांगलेच लोकप्रिय आहे. मात्र आता ‘ओयो’ने आपल्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. यापुढे अविवाहित जोडप्यांना ‘ओयो’ हॉटेलमध्ये थेट एंट्री दिली जाणार नाही. आतापर्यंत प्रेमीयुगुलांना ‘ओयो’मध्ये पटकन रुम बुक करता येत होती. मात्र आता यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरातून हे नवे नियम पहिल्यांदा लागू करण्यात आले आहेत.

पीटिआयने सदर वृत्त दिले आहे. ज्यात म्हटले आहे की, ‘ओयो’ने अविवाहित जोडप्यांना सरसकट एंट्री देण्यावर बंदी आणली आहे. जर यापुढे जोडप्यांना ‘ओयो’मध्ये रुम बुक करायची असेल तर त्यांना त्यांच्या लग्नाचा पुरावा द्यावा लागेल. हा नियम ऑनलाईन बुकिंगसाठीही लागू करण्यात आला आहे. ही नियमावली तात्काळ लागू करावी, असे निर्देश ‘ओयो’ने मेरठमधील संलग्न हॉटेल्सना दिले आहेत.

Groom walks through traffic to chase his Barat
लग्नाची वरात गेली निघून अन् नवरदेव अडकला वाहतूक कोंडीत….पुढे काय झाले? पाहा Viral Video
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Lock in period of marriage court verdict chatura article
विवाहाचा लॉक-इन पिरीयड
Living apart together trend
‘Living apart together’ म्हणजे काय? जोडप्यांमध्ये हा ट्रेंड का वाढतोय?
Gujarat wedding over food
Gujarat : लग्नात भासली जेवणाची कमतरता, मुलाच्या कुटुंबीयांनी थांबवला विवाह, वधूने पोलिसांना बोलावलं अन् पुढे घडलं असं की…
5995 couples got divorced in seven years from 2018 to 2024 in nagpur
नागपुरात रोज होतात दोन घटस्फोट! काय आहे कारण…
समान नागरी कायद्याअंतर्गत 'या' व्यक्तींबरोबर करता येणार नाही लग्न; नेमक्या अटी काय? (फोटो सौजन्य @Freepik)
UCC Marriage Law : समान नागरी कायद्याअंतर्गत ‘या’ व्यक्तींबरोबर करता येणार नाही लग्न; नेमक्या अटी काय?
tina datta talks about being single mother
३३ वर्षीय अभिनेत्री लग्न न करताच आई होणार? म्हणाली, “पतीवर अवलंबून राहणं…”

हे वाचा >> OYO चा फूल फॉर्म माहितीये का? ओयोची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या

कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे की, सदर बदल केल्यानंतर मेरठचा अनुभव घेऊन इतर शहरातही अशाच प्रकारचे बदल केले जाणार आहेत. मेरठसह इतर काही शहरांमधून नागरिकांकडून ‘ओयो’कडे याबाबत वारंवार विचारणा होत होती. ‘ओयो’ हॉटेलमध्ये अविवाहित जोडप्यांना रुम बुक करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशा मागण्या इतर शहरांमधून समोर आलेल्या आहेत, अशी माहिती ओयोने दिली.

‘ओयो’ कंपनीने काय म्हटले?

ओयोचे उत्तर भारत क्षेत्राचे प्रमुख पावस शर्मा म्हणाले की, सुरक्षित आणि जबाबदार अशी आदरातिथ्याची सेवा देण्यासाठी ओयो कटिबद्ध आहे. आम्ही वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करतो. पण ज्या प्रदेशात आमचा व्यवसाय सुरू आहे, तेथील कायदा आणि नागरी संघटनांना सहकार्य करणे, हीदेखील आमची जबाबदारी आहे. या बदलानंतर आम्ही वेळोवेळी या धोरणाचा आणि त्याच्या परिणामांचा आढावा घेत राहू.

हे ही वाचा >> पैशांसाठी सीमकार्ड विक्री ते १६००० कोटींची संपत्ती, वाचा OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या यशाची भन्नाट कहाणी!

धारणा बदलण्याची योजना

ओयोबद्दलची धारणा बदलण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. या माध्यमातून ओयो हॉटेल्स कुटुंब, विद्यार्थी, व्यावसायिक प्रवासी, धार्मिक यात्रेकरू आणि एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुरक्षित असल्याचे ठसविण्यासाठी हे नवे बदल करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या बदलाच्या माध्यमातून ग्राहकांनी ओयोमध्ये अधिक दिवस राहावे आणि पुन्हा पुन्हा बुकिंग करावे, असा प्रयत्न केला जात आहे.

Story img Loader