अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात महिला कुस्तीगिरांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. या प्रकरणात ब्रिजभूषण यांच्याविरोधात दोन गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. मागच्या ९ दिवसांपासून महिला कुस्तीगीर आंदोलन करत आहेत. न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी केली आहे. अशात माजी धावपटू पी.टी. उषा यांनी एक वक्तव्य या कुस्तीपटूंना उद्देशून केलं होतं. मल्लांनी अशा प्रकारे आंदोलन केल्यानं भारताची प्रतिमा मलीन होते आहे असं पी.टी. उषा म्हणाल्या होत्या. थोडी तरी शिस्त पाळायला हवी होती असंही त्या म्हणाल्या होत्या. मात्र या कुस्तीपटूंना शिस्त शिकवणाऱ्या पी.टी. उषा यांच्यावर नियम मोडल्याप्रकरणी कारवाई झाली होती.

पी. टी. उषा यांनी हे वक्तव्य केलं. मात्र इतिहासात डोकावून पाहिलं तर नियम मोडल्या प्रकरणी उषा यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. उषा यांना असं वाटतं आहे की आत्ता जे आंदोलन मल्ल करत आहेत ते शिस्तभंगामध्ये मोडतं. तुम्ही आमच्याकडे म्हणजेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनकडे यायला हवं होतं. मात्र हे सांगणाऱ्या पी.टी उषा यांच्या कारकिर्दीतही असे काही निर्णय त्यांनी घेतले ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा डागाळली.

पी. टी. उषा यांच्यावर नियम मोडल्याचा आरोप

१९८४ मध्ये लॉस एंजलिसमध्ये ऑलिम्पिकमध्ये पी.टी. उषा चौथ्या स्थानावर होती. मेडलच्या अत्यंत जवळ जाऊन पी. टी. उषा यांना त्या मेडलने हुलकावणी दिली होती. मात्र या स्पर्धेने देशात पी. टी. उषा यांना खूप महत्त्व वाढलं होतं. तसंच त्यांचे कोच नांबियार यांचंही महत्त्व त्या काळात वाढलं होतं. हेच कारण होतं की १९८८ मध्ये जेव्हा ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये फक्त पी. टी
उषा यांच्यासाठी रिले रेसच्या ट्रायचली मागणी करण्यात आली. ऑलिम्पिकच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं होतं. ज्यामुळे आपल्या देशात बराच वाद झाला.

रिलेसाठी ट्रायल्सची मागणी कशी वादात अडकली?

१९८८ च्या या ऑलिम्पिक स्पर्धेत ४/४०० मीटर रिले स्पर्धा होती. यामध्ये वंदना शानबाग, वंदना राव, मर्सी कुट्टन आणि शाइनी अब्राहम यांना ट्रायल्स घेऊन निवडलं गेलं. राखीव खेळाडू म्हणून अश्विनी नचप्पालाही सियोलला पाठवण्यात आलं. ऑलिम्पिकला पोहचल्यानंतर पी.टी. उषा आणि त्यांचे कोच नांबियार यांनी नॅशनल कोचकडे ही मागणी केली की पी.टी. उषाही रिलेमध्ये धावणार, त्यासाठी तिची ट्रायल घेतली जावी. रेसच्या तयारीला लागलेले सगळे खेळाडू या निर्णयामुळे नाराज झाले होते. तरीही ट्रायल करण्याचा निर्णय घेतला गेला होता.

ट्रायल्सला पोहचल्याच नाहीत पी.टी. उषा

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ट्रायल्स होणार होती. पी.टी. उषा या ट्रायल्सला पोहचल्याच नाहीत तसंच कोच नांबियारही आले नाहीत. यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा नांबियार यांनी पी.टी. उषा यांची ट्रायल घेण्याची मागणी केली. मात्र तेव्हा ट्रायल्सला बंदी केली गेली. त्यानंतर त्यांनी थेट पी.टी. उषा यांना संघात घ्या असं त्यांनी म्हटलं होतं. वंदना राव यांच्या ऐवजी पी.टी. उषा यांना स्थान दिलं जावं अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर वंदना राव यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे असं काही घडलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे भारताचे खेळाडू ऑलिम्पिकची तयारी करत होते. अशात भारतीय मीडियाने त्यांच्यावर खूप टीका केली होती. तसंच विदेशी मीडियानेही आपल्या देशाची खूप थट्टा त्या काळात केली होती. पी. टी. उषा यांच्या हट्टामुळे देशाची प्रतिमा डागाळली गेली. त्यानंतर अखेर रिलेमध्ये पी.टी. उषा यांनी भाग घेतला नाही. पी. टी. उषा यांच्या वर्तनामुळे शिस्त न पाळणाऱ्या खेळाडू असं त्यांच्याविषयी बोललं गेलं. आता त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यानंतर देशाला पुन्हा एकदा तेव्हा काय घडलं होतं याची आठवण आली आहे.