scorecardresearch

Padma Awards 2022 : नीरज चोप्राला पद्मश्री पुरस्कार; वाचा क्रीडाक्षेत्रात कुणाला मिळालाय हा सन्मान!

यापूर्वी नीरजला परम विशिष्ट सेवा पदक देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Padma Awards 2022 Announcement in sports
नीरज चोप्राला पद्मश्री पुरस्कार

केंद्र सरकारने मंगळवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस म्हणजेच आज(२५ जानेवारी) पद्म पुरस्कारांची घोषणा केली. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. आजच नीरजला परम विशिष्ट सेवा पदक देण्याची घोषणा करण्यात आली. नीरज व्यतिरिक्त टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या चार खेळाडूंना पद्म पुरस्कार देण्यात येणार आहेत.

पद्मभूषण पुरस्कार –

पॅरालिम्पिक भालाफेकपटू देवेंद्र झाझारियाला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. देवेंद्र हा भारतातील एकमेव खेळाडू आहे ज्याने तीन पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारतासाठी पदके जिंकली आहेत. २००४मध्ये अथेन्स येथे पार पडलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेकमध्ये त्याने प्रथम सुवर्णपदक जिंकले होते. २०१६मध्ये रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेतही त्याने या कामगिरीची पुनरावृत्ती केली होती. गेल्या वर्षी टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला होता.

हेही वाचा – Padma Awards 2022 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस ‘पद्म’ पुरस्कारांची घोषणा

पद्मश्री पुरस्कार –

  • सुमित अंतिल, पॅरालिम्पिक भालाफेकपटू, हरियाणा
  • प्रमोद भगत, बॅडमिंटन, ओडिशा
  • नीरज चोप्रा, भालाफेकपटू, हरयाणा
  • शंकरनारायण मेनन, मार्शल आर्ट्स, केरळ
  • फैसल अली दार, कुंग-फू, जम्मू आणि काश्मीर
  • वंदना कटारिया, हॉकी, उत्तराखंड
  • अवनी लेखरा, पॅरालिम्पिक नेमबाज, राजस्थान
  • ब्रह्मानंद संखवाळकर, फुटबॉलपटू, गोवा

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Padma awards 2022 announcement in sports adn

ताज्या बातम्या