वायव्य पाकिस्तानात एका स्थानिक पश्तू गायकाची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हत्या केली. फकीर किल्ले परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात वझीर खान आफ्रिदी या गायकाचा मृत्यू झाला. खैबर प्रांतातील ते एक प्रसिद्ध गायक होते. अगोदरच्या वृत्तानुसार गायक आफ्रिदी यांना दहशतवाद्यांकडून गाणे थांबवण्यासाठी धमक्या येत होत्या व यासाठी त्यांचे तीनदा अपहरण करण्यात आले होते. एकदा त्यांना पेशावर येथून पळवून नेण्यात आले होते. प्रत्येक वेळी त्यांना आपण पुन्हा गाणे सुरू करणार नाही या अटीवर सोडून देण्यात आले होते. त्यांचे किमान ४० दृक्श्राव्य अल्बम प्रसिद्ध होते. गाण्यास बंदी घालणारा दहशतवाद्यांचा हुकूम न पाळल्याने त्यांची पेशावर येथील उपनगरात हत्या करण्यात आली.