गेल्या काही वर्षांपासून सातत्याने खालावत चाललेल्या पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीची सर्वच आशियाई देशांना चिंता वाटू लागली आहे. एकीकडे अर्थव्यवस्था ढासळत असताना दुसरीकडे समाजविघातक शक्ती पाकिस्तानमध्ये आपले हातपाय पसरू लागल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे अशांत पाकिस्तान कोणत्याच आशियाई देशासाठी सुरक्षित नसल्याचं बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर अक्षरश: गटांगळ्या खाणाऱ्या पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या मदतीला IMF धावून आली आहे. आयएमएफनं पाकिस्तानला देऊ केलेल्या ३ बिलियन डॉलर्सच्या कर्जाचा दुसरा हप्ता जारी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

पाकिस्तान आर्थिक दुरवस्थेच्या गर्तेत

पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर चिंता व्यक्त होत असताना आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नियोजित आराखडा तयार करण्यात आला. गेल्या वर्षभरापासून आयएमएफ आणि पाकिस्तान सरकार यांच्यात या करारासंदर्भात वाटाघाटी सुरू होत्या. यानुसार आयएमएफला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ठरवून दिलेल्या आर्थिक नियमांचं काटेकोरपणे पालन करणं क्रमप्राप्त ठरलं आहे. एकूण तीन टप्प्यांमध्ये आयएमएफकडून पाकिस्तानला हे ‘विशेष आर्थिक सुधारणा’विषयक कर्ज दिलं जाणार आहे. यातल्या प्रत्येक टप्प्याची रक्कम जारी करण्यापूर्वी आयएमएफकडून पाकिस्तानमधील स्थितीचा आणि नियमांचं पालन होतंय की नाही, याचा आढावा घेतला जाणार आहे.

joi biden
अन्वयार्थ: बायडेन प्रशासनाचा नैतिक विजय..
stop manipur violence
‘मणिपूरमध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन’, अमेरिकेच्या टिप्पणीनंतर भारताची रोखठोक प्रतिक्रिया
IRGC behind Israel attack
इस्रायलच्या हल्ल्यामागे कुणाचा हात? ज्यू राष्ट्रावर हल्ला करणारी इस्लामिक संघटना कोणती?
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
imf bailout package for pakistan
आयएमएफची पाकिस्तानच्या कर्जाच्या दुसऱ्या हप्त्याला मंजुरी (फोटो – रॉयटर्स संग्रहीत)

जुलै महिन्यात आला पहिला हप्ता!

गेल्या वर्षी जुलै महिन्यात आयएमएफकडून पाकिस्तानला या कर्जाचा पहिला टप्पा म्हणून जवळपास १२०० मिलियन डॉलर्स एवढी रक्कम देण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये आयएमएफ व पाकिस्तान सरकार यांच्यात सविस्तर चर्चा झाली. या बैठकांमधून पाकिस्ताननं पहिल्या टप्प्यात अदा करण्यात आलेल्या रकमेचा कसा वापर केला आहे? पाकिस्तानमधली सध्याची आर्थिक स्थिती काय आहे? व आयएमएफनं ठरवून दिलेल्या नियमांचं पालन काटेकोरपणे केलं जात आहे की नाही? अशा मुद्द्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

…अखेर पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली, १९७१- विजय दिवसाचे महत्त्व काय?

नुकतीच आयएमएफनं दुसऱ्या टप्प्यातील ७०० मिलियनची रक्कम अदा करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता आयएमएफकडून पाकिस्तानला देण्यात आलेल्या कर्जाच्या रकमेचा आकडा १९०० मिलियन इतका झाला आहे. आता तिसऱ्या टप्प्याची रक्कम या वर्षी मे महिन्यात अशाच प्रकारे सविस्तर आढावा घेऊन पाकिस्तानला दिली जाईल.

पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी निवडणुका

एकीकडे पाकिस्तानमध्ये आर्थिक स्थिती खालावलेली असताना पुढील महिन्यात पाकिस्तानमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील आर्थिक उलाढाली व इतर संबंधित बाबी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यामुळे आयएमएफकडून जारी करण्यात आलेल्या कर्जाचा दुसरा हप्ता पाकिस्तान सरकारसाठी मोठा दिलासा देणारा ठरल्याचं बोललं जात आहे.