पाकिस्तानातील एक थोर समाजसुधारक आणि ‘ईदी फाउंडेशनची’ स्थापना करणाऱ्या ‘अब्दुल सत्तार ईदी’ यांच्या निधनाने पाकिस्तानसह साऱ्या जगातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ईदी यांच्या निधनाच्या बातमीचे महत्तव लक्षात घेता अनेक प्रसारमाध्यमांनी या बातमीचे प्रसारण करत ईदी यंच्या जीवनकार्याचा आढावा घेतला आहे. दरम्यान या बातमीचे वार्तांकन करताना पाकिस्तानातील एका वाहिनीच्या प्रक्षेपणाने तेथील वातावरणात काहीसा गोंधळ उडाला आहे. पाकिस्तानातील ‘न्यूज एक्स्प्रेस’ वाहिनीच्या एका वार्ताहराने अब्दुल सत्तार ईदी यांच्या मृत्यूच्या बातमीचे वार्तांकन थेट त्यांच्या कबरीतूनच (थडग्यातून) केले आणि आणि सर्वत्र एकच खऴबऴ माजली. वार्तांकनाच्या या पद्धतीमुळे ट्विटर व इतर सोशल नेटवर्किंग साइट्सवर काही थक्क करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहे. ट्विटरवर आलेल्या काही ट्विट्सनुसार ‘ती’ कबर पंचवीस वर्षांपुर्वीच ईदींच्या गावी त्यांच्यासाठीच बांधण्यात आली होती. ‘न्यूज एक्स्प्रेस’ वाहिनीच्या या वार्ताहराने या कबरीतूनच वार्तांकन केले आहे असे छायाचित्र आणि बातमी जरी असली तरीही त्यासंबंधीचा कोणताही व्हि़डिओ सध्यापर्यंत तरी प्रसारमाध्यमांच्या हाती लागलेला नाही.