पाकिस्तानी सैन्याकडून सोमवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय छावण्यांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झाले नसून, कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.
पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. स्वयंचलित शस्त्रांच्या साह्याने पाकिस्तानने भारतीय छावण्यांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. पूंछ जिल्ह्यातील गार्ही भागामध्ये नियंत्रणरेषेवर रविवारी मध्यरात्रीनंतर हा गोळीबार करण्यात आल्याचे लष्कराचे प्रवक्ते कर्नल आर. के. पाल्टा यांनी सांगितले.
नियंत्रणरेषेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानकडून होणाऱया गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच होता, असेही ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Aug 2013 रोजी प्रकाशित
पाकिस्तानकडून नियंत्रणरेषेवर पुन्हा बेछूट गोळीबार
पाकिस्तानी सैन्याकडून सोमवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय छावण्यांवर बेछूट गोळीबार करण्यात आला.
First published on: 26-08-2013 at 05:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani troops violate ceasefire again