श्रीनगर, जम्मू : जम्मू आणि काश्मीरमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची मागिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामध्ये मुख्यत: जम्मू व काश्मीरचे नागरिक, सुरक्षा दलांचे सैनिक आणि माजी दहशतवाद्यांशी विवाह केलेल्या महिलांचा आणि त्यांच्या मुलांचा समावेश आहे.

जवळपास ६० पाकिस्तानी नागरिकांना वाघा सीमेवर पाठवण्यातआले. या सर्वांना जम्मू आणि काश्मीरच्या विविध जिल्ह्यांमधून आणले गेले आणि बसद्वारे पंजाबला नेण्यात आले. तिथे त्यांना वाघा सीमेवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या हवाली केले जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. २०१०मध्ये अनेक दहशतवाद्यांनी शरणागती पत्करत मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला होता.

अशा माजी दहशतवाद्यांच्या पाकिस्तानी पत्नी आणि मुलांचा देशाबाहेर काढले जाणाऱ्यांमध्ये जास्त करून समावेश आहे. त्यापैकी ३६ जण श्रीनगरमध्ये राहत होते. बारामुल्ला आणि कुपवाडा जिल्ह्यात प्रत्येकी नऊ, बडगामध्ये चार आणि शोपियांमध्ये राहणारे दोन आहेत.