फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील एका शाळेत घुसून अज्ञाताने धुमाकूळ घालून शिक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, हल्लेखोर ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पॅरिसच्या उत्तरेकडील एका नर्सरी शाळेत घुसून या हल्लेखोराने शिक्षकावर चाकूहल्ला केला. यात शिक्षक गंभीर जखमी झाला. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले पण तोपर्यंत हल्लेखोराने तेथून पोबारा केला होता. हल्लेखोराने हल्ला करताना ‘इसिस’च्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. जखमी झालेल्या शिक्षकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, गेल्याच महिन्यात पॅरिसमध्ये दहशतवाद्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यात १३० निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला होता.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2015 रोजी प्रकाशित
पॅरिसमध्ये शाळेत घुसून शिक्षकावर चाकू हल्ला, हल्लेखोर ‘इसिस’चा सदस्य असल्याचा संशय
हल्लेखोराने हल्ला करताना 'इसिस'च्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
Updated:
First published on: 14-12-2015 at 15:46 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paris teacher attacked by man claiming to represent islamic state