काश्मीरमध्ये जमीन आणि स्थायी निवास यावर विशेष दर्जा देणारे कलम ३५ अ (Article 35 A) संपुष्टात आणले जाण्याच्या शक्यतेवरून आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी इशारा दिला आहे. पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, आगीशी खेळू नका, ‘कलम ३५ अ’ शी छेडछाड करू नका, नाहीतर १९४७ पासून आतापर्यंत तुम्ही जे पाहिले नाही ते पाहाल. जर असे झाले तर मला माहीत नाही की जम्मू-काश्मीरचे लोक तिरंगा घेण्याऐवजी हाती कुठला झेंडा घेतील ? अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला आहे.

तत्पूर्वी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला म्हणाले की, केंद्र सरकार आणि गव्हर्नर यांची राज्यात निवडणूक घेण्याची जबाबदारी आहे. यासाठी निवडणुका घ्या, लोकांना निर्णय घेऊ द्या. नवे सरकार स्वत:च कलम ३५ ला अ सुरक्षित करण्याच्या दिशेने काम करेन.

अब्दुल्ला यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमध्ये नेहमी निवडणुकीत अडथळा आणणाऱ्या फुटीरतावादी ताकदीसमोर आणि दहशतवाद्यांसमोर मोदी सरकार गुडघे टेकतील का ? की निर्धारित वेळेत निवडणुका होतील, असा सवाल केला आहे.