जम्मू-काश्मीरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पक्षाने हातमिळवणी केली आहे. भाजपाने २० जून २०१८ रोजी पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे मेहबूबा मुफ्ती सरकार कोसळले. तेव्हापासून काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट सुरू होती. आता काँग्रेस आणि पीडीपीने नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या साथीने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये पीडीपीचे २८, नॅशनल कॉन्फरन्सचे १५ आणि काँग्रेसचे १२ आमदार आहेत. पीडीपी-नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस मिळून ५५ आकडा होतो. जम्मू काश्मीरमध्ये सत्ता स्थापनेसाठी ४४ आमदारांची गरज असते.

पीडीपीचे ज्येष्ठ नेते अलताफ बुखारी यांचे नाव जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरमधील नव्या आघीडीचे नेतृत्व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुला यांनी करावी अशी इच्छा पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांची होती. मात्र, फारूख अब्दुला यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे. ‘नॅशनल कॉन्फरन्स सत्तेत सहभागी होणार नाही, मात्र सत्ता स्थापनेसाठी सरकारला पाठिंबा देणार असल्याचे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुला यांनी स्पष्ट केले आहे.

‘बुधवारी संध्याकाळी या नव्या आघाडीने राज्यपाल यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केल्याची माहिती द इंडियन एक्सप्रेसला पीडीपीच्या एका जेष्ठ नेत्याने दिली.’

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pdp nc and congress set to join hands to form govt in jammu and kashmir
First published on: 21-11-2018 at 19:25 IST