लहान बचत योजनांमध्ये व्याजकपात करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आलीय. अर्थ मंत्रालयाकडून यासंदर्भातील निर्णय घेण्यात आलाय. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना झटका देणारा हा निर्णय २४ तासांच्या आत मागे घेण्यात आलाय. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून लहान बचत योजनांमध्ये व्याजकपात जाहीर करण्यात आली होती. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा आदेश चुकून निघाल्याचं सांगत व्याजदर जैसे थे राहतील असं गुरुवारी सकाळी स्पष्ट केलं आहे. निर्मला सीतारमन यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निर्मला सीतारमन यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं आहे –
“केंद्र सरकारच्या लहान बचत योजनांवरील व्याजदर २०२०-२०२१ च्या शेवटच्या तिमाहीत होते तेच राहतील, म्हणजेच मार्च २०२१ पर्यंतचे दर. चुकून प्रसिद्ध करण्यात आलेला आदेश मागे घेण्यात येईल,” असं निर्मला सीतारमन यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.

मात्र निर्मला सीतारमन यांनी हा निर्णय मागे देताना दिलेलं कारण अनेकांना खटकं आहे. हा आदेश निवडणुकामुळे मागे घेतला आहे की एप्रिल फूल करत आङात असं अनेकांनी थेट निर्माला यांच्या ट्विटरवर रिप्लाय देताना विचारलं आहे. ट्विटरवरुन अनेकांनी यासंदर्भात थेट नाराजी व्यक्त केली आहे. एवढा महत्वाचा आदेश चूकून कसा निघाला?, निवडणुकांमुळे मागे घेतला की एप्रिल फूल करताय?, अशापद्धतीने चुकून एवढा मोठा निर्णय कसा काय जाहीर करण्यात आला?, संबंधितांवर कारवाई करणार का?, भारतीयांबरोबर एप्रिल फूल्स डे प्रँक केलाय का?, ही गंभीर चूक वाटत नाही का? हे आणि असे अनेक प्रश्नांचा नेटकऱ्यांनी पाऊस पाडलाय. अनेकांनी यासंदर्भात उघडपणे नाराजी व्यक्त करत हे बेजबाबदारपणाचं वागणं असल्याचं म्हटलं आहे.

१) सगळा गोंधळ

२) मंत्री आणि अधिकाऱ्यांचा ताळमेळ नाही

३) एप्रिल फूल मेसेज असणार

४) निवडणुकांमुळे घेतला निर्णय

५) खरा अर्थ

६) राजीनामा द्या

७) ते पाहा तुमच्यासोबत एक प्रँक झालाय

८) अर्थ समजून घ्या

९) बेस्ट जोक

१०) मनोरंजन आहे यांच्यासाठी

११) कसा वाटला विनोद

१२) फटका बसेल हे लक्षात आलं

१३) निवडणुका विसरल्या

१४) विनोद होता

१५) राजीनामा

काय होता निर्णय –
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी (१ एप्रिल ते ३० जून २०२१) नवे व्याजदर जाहीर करण्यात आले होते. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदर ०.७ टक्क्याने कमी करून ६.४ टक्क्यांवर आणण्यात आला होता. पोस्टाच्या बचत खात्यावरील व्याज वार्षिक ४ वरून ३.५ टक्के करण्यात आले होते. एक वर्षांच्या मुदतठेवींवरील व्याजदर ५.५ वरून ४.४ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याज ७.४ वरून ६.५ टक्के करण्यात आले होते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ६.८ वरून ५.९ टक्के तर किसान विकासपत्रांवरील व्याजदर ६.९ टक्क्यांवरून ६.२ टक्के करण्यात आले होते. सुकन्या समृद्धी योजनेचेही व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: People slams fm nirmala sitharaman after she said orders to cut interest rate were issued by oversight shall be withdrawn scsg
First published on: 01-04-2021 at 09:26 IST