इंधनदरवाढीची समस्या केवळ भारतामध्येच नाहीय तर भारताचा शेजारी देश असणाऱ्या श्रीलंकेमध्येही इंधनदरवाढीचा भडका उडालाय. सध्या श्रीलंकेमध्ये एक लिटर पेट्रोलची किंम १७७ रुपये तर डिझेलची किंमत १२२ रुपये इतकी आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांच्या खर्चाचं गणित विस्कळीत झालंय. श्रीलंकेमध्ये महागाईसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलीय. तेथील सरकारच्या हाती परदेशी जवळजवळ संपुष्टात आलं आहे. आयात केलेल्या वस्तुंचे पैसे देण्याइतकेही परदेशी चलन सध्या देशात नाहीय. त्यामुळेच आता श्रीलंकेने भारताकडे मदत मागितलीय.
नक्की वाचा >> संजय राऊत म्हणतात, “पेट्रोल-डिझेलचे दर ५० रुपयांनी कमी करायचे असतील तर…”
श्रीलंकेमधील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी आणि इंडियन ऑइल कॉर्परेशनच्या स्थानिक सहाय्यक विभागाने देशामधील परदेशी चलनाचा तुटवडा सुरु असतानाच इंधनाचे दर वाढवले आहे. दुसरीकडे श्रीलंकन सरकारने आता भारत आणि ओमान सरकारसोबत इंधन खरेदीसाठी कर्ज सहाय्यता करार करता येईल का यासंदर्भातील चर्चा सुरु असल्याचं म्हटलंय.
श्रीलंकेमधील सरकारी तेल कंपनी असणाऱ्या सीलोन पेट्रोलियम कॉर्परेशन म्हणजेच सीपीसीने सरकारकडे इंधनाचे दर वाढवण्याची मागणी केली होती. मात्र सरकारने ऑक्टोबरपासून ही मागणी टाळलीय. इंधनदरवाढ करण्यासाठी कंपनीकडून वारंवार पाठपुरवठा करुनही सरकारने इंधनदरवाढीला परवानगी दिली नाही. मात्र कंपनीने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार पेट्रोलचे दर २० रुपये प्रति लिटरने तर डिझेलचे दर १० रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आलेत. त्यामुळेच येथे पेट्रोल १७१ रुपये लिटर तर डिझेल १२१ रुपये लिटरपर्यंत गेलं आहे.
नक्की पाहा हे फोटो >> राणीचे तीन बॉडीगार्ड्ससोबत अनैतिक संबंध, ५ हजार ५०० कोटींची पोटगी अन्…; दुबईच्या राजा-राणीच्या संसाराची फसलेली गोष्ट
इंडियन ऑइलची सहाय्यक कंपनी असणाऱ्या लंका आईओसीचं पेट्रोल तीन रुपयांनी महागणार आहे. श्रीलंकेला परदेशी चलनाची चणचण भासत असून परिस्थिती अशी आहे की डिसेंबर संपेपर्यंत देशातील सरकारकडे असणारं सर्व परदेशी चलन संपुष्टात येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये डॉलरचा तुटवडा असल्याने देशातील एकमेव तेल रिफायनरी बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले. त्यामुळेच आता श्रीलंकेमध्ये तेल पूर्णपणे आयात केलं जात आहे.
नक्की वाचा >> चारचाकीवाल्यांनाच पेट्रोल लागतं, ९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही; योगींच्या मंत्रीमंडळामधील मंत्र्याचं तर्क
भारत आणि ओमानसोबत क्रेडिट मर्यादेवर चर्चा सुरु असून या देशांकडून इंधन विकत घेण्यासंदर्भात प्रयत्न सुरु असल्याचं श्रीलंकन सरकारचं म्हणणं आहे.