जागतिक स्तरावर तेलाचे दर कोसळले असतानाच पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरांत वाढ करण्यात येत असल्याची घोषणा सरकारने सोमवारी केली. गेल्या पंधरवडय़ातील ही दुसरी दरवाढ आहे. यामुळे पेट्रोल लिटरमागे २ रुपये १९ पैशांनी, तर डिझेल लिटरमागे ९८ पैशांनी महागणार आहे. ही वाढ सोमवारी मध्यरात्रीपासून अंमलात आली आहे. दिल्लीत आता पेट्रोलचा दर सध्याच्या ५९.६८ रुपये लिटरवरून ६१.८७ रुपये इतका असेल. तर डिझेलचा दर ४८.३३ वरून ४९.३१ रुपये इतका होईल.
१७ मार्च रोजीच पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे तीन रुपये व १ रुपये ९० पैसे इतकी वाढ झाली होती. येत्या पंधरवडय़ात पेट्रोलच्या दरांत दुसऱ्यांदा तर डिझेलच्या दरांत चौथ्यांदा वाढ झाली आहे. पेट्रोल व डिझेलचे आंतरराष्ट्रीय दर तसेच रुपये व डॉलरच्या विनिमय दरांच्या अनुसार ही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा ग्राहकांवर मोठा बोजा पडणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2016 रोजी प्रकाशित
पेट्रोल, डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ
१७ मार्च रोजीच पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे तीन रुपये व १ रुपये ९० पैसे इतकी वाढ झाली होती.

First published on: 05-04-2016 at 01:49 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Petrol diesel prices increased again