scorecardresearch

फळ विक्रेत्यावर भाजपा-संघ कार्यकर्त्यांच्या हेरगिरीची जबाबदारी; PFIच्या कटाची धक्कादायक माहिती आली समोर

एनआयएने पीएफआयशी संबंधित असल्याचा आरोपाखाली केरळमधील कोल्लम जिल्ह्यातून त्याला अटक केली होती.

PFI gave task to fruit seller
फोटो – द इंडियन एक्सप्रेस

पीएफआयने एका फळ विक्रेत्याला आरएसएस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी दिल्याची धक्कादायक बाब एनआयएच्या तपासात उघड झाली आहे. एनआयएने पीएफआयशी संबंधित असल्याचा आरोपाखाली केरळमधील कोल्लम जिल्ह्यातून त्याला अटक केली होती.

हेही वाचा – नेपाळच्या पवित्र नदीतल्या शाळिग्राम शिळेत कोरले जाणार भगवान श्रीराम, जनकपूरवरून येणार धनुष्य

‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्रीय तपास संस्थेने १७ जानेवारी रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यात काही ठिकाणी छापे टाकले होते. यावेळी त्यांनी मोहम्मद सादिक या फळ विक्रेत्याला अटक केली होती. त्याच्या चौकशीदरम्यान पीएफआयने त्याला कोल्लमध्ये होणाऱ्या आरएसएस आणि भाजपाच्या कार्यक्रमाची माहिती गोळा करण्याची जबाबदारी दिली होती, अशी धक्कादायक माहिती उघड पुढे आली आहे.

हेही वाचा – विमान उड्डाणाला उशीर, प्रवाशाचा संताप; विमान हायजॅक झाल्याचं ट्वीट, दिल्लीत सुरक्षा यंत्रणांची धावपळ

सादिक २०१२ पासून PFIच्या संपर्कात

मोहम्मद सादिक हा २०१२ मध्ये पीएफआयच्या संपर्कात आला होता. पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी त्याचे ब्रेनवॉश केले. काही दिवसांपूर्वी कोल्लम येथे होणाऱ्या भाजपाच्या कार्यक्रमात येणारे नेत्यांची माहिती गोळा करण्याची जबाबादारी देण्यात आली. विशेष म्हणजे सादिकला अटक केल्यानंतर त्याच्याकडे एनआयएला भाजपाच्या कार्यक्रमाची आणि नेत्यांच्या नावांची यादी मिळाली होती. दरम्यान, याप्रकरणी एनआयए पुढील तपास करत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 15:26 IST