पीटीआय, नवी दिल्ली
तांत्रिक बिघाड झाल्यामुळे थायलंडमधील फुकेत येथून दिल्लीला येणारे विमान तब्बल चार दिवस अडकून पडले आहे. या विमानामध्ये किमान ३० प्रवासी असून त्यांना परत आणण्यासाठी लवकरच व्यवस्था केली जाईल, असे एअर इंडियाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. अवघ्या पाच तासांच्या प्रवासाला चार दिवस लागल्यामुळे या विमानातील प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
हेही वाचा : पुतिन यांचा भारत दौरा लवकरच!
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
विमानात १६ नोव्हेंबरपासून अडकून पडलेल्या प्रवाशांनी समाजमाध्यमांद्वारे तक्रारी केल्यानंतर हे प्रकरण मंगळवारी उजेडात आले. कंपनीने जारी केलेल्या पत्रकात प्रवाशांची माफी मागितली असून त्यांना लवकरात लवकर परत आणले जाईल, असे आश्वासन दिले आहे.