अमेरिकेने इटली सरकारच्या विनंतीवरून पाब्लो पिकासोने काढलेले ‘कॉपोटियर ए तासी’ ऊर्फ ‘फ्रूट बाउल अँड अ कप’ हे चित्र देशाबाहेर जाऊ दिले नाही. या चित्राची किंमत १.१५ कोटी रुपये आहे. इटलीच्या सरकारने केलेल्या विनंतीमुळे हे चित्र देशाबाहेर नेण्यास मनाई हुकूम घेऊन हे चित्र अमेरिकेने जप्त केले.
गॅब्रिएला अमाटी व त्यांचे दिवंगत पती अँजेलो मॅज यांच्यावर इटलीच्या मिलान शहरातील सरकारी वकील कार्यालयाने गैरव्यवहाचा व दिवाळखोरीचा गुन्हा दाखल केला असून, त्यासंदर्भात इटलीच्या सरकारच्या न्याय खात्याने केलेल्या विनंतीनुसार हे चित्र जप्त करण्यात आले. हंगामी अॅटर्नी जनरल मैथिली रामन यांनी सांगितले की, पिकासोचे चित्र अमेरिकेबाहेर जाऊ देण्यास मनाई देण्यात जे यश आले आहे त्यामुळे आमच्या देशाच्या जगातील कायदा अंमलबजावणी संस्थांशी असलेला संपर्क स्पष्ट झाला आहे. हे चित्र ही मालमत्ता असून त्यामुळे अमाटी दांपत्याकडून ४.४ कोटी डॉलरचा कर वसूल करणे नेपल्स शहराच्या व्यवस्थापनाला शक्य होणार आहे. नेपल्स शहराच्या करवसुलीतून जमा झालेला पैसा या दांपत्याने स्वत:च्या बँक खात्यात जमा केला होता व त्यामुळे ३.३ कोटी युरोचे नुकसान झाले होते.
संग्रहित लेख, दिनांक 25th Jun 2013 रोजी प्रकाशित
पिकासोचे चित्र अमेरिकेबाहेर नेण्यास इटली सरकारच्या विनंतीवरून मनाई
अमेरिकेने इटली सरकारच्या विनंतीवरून पाब्लो पिकासोने काढलेले ‘कॉपोटियर ए तासी’ ऊर्फ ‘फ्रूट बाउल अँड अ कप’ हे चित्र देशाबाहेर जाऊ दिले नाही. या चित्राची किंमत १.१५ कोटी रुपये आहे. इटलीच्या सरकारने केलेल्या विनंतीमुळे हे चित्र देशाबाहेर नेण्यास मनाई हुकूम घेऊन हे चित्र अमेरिकेने जप्त केले.
First published on: 25-06-2013 at 07:58 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Picasso seized by u s authorities as italy prosecutes paintings owner for fraud