scorecardresearch

Premium

२२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान नेपाळमध्ये बेपत्ता; ४ भारतीय नागरिकांचा समावेश

नेपाळमधील पोखराहून जोमसोमला जाणाऱ्या एका प्रवाशी विमानाचा रविवारी सकाळी संपर्क तुटला आहे. या विमानात एकूण २२ प्रवाशी होते.

फोटो सौजन्य- तारा एअर
फोटो सौजन्य- तारा एअर

नेपाळमधील पोखराहून जोमसोमला जाणाऱ्या एका प्रवाशी विमानाचा रविवारी सकाळी संपर्क तुटला आहे. या विमानात एकूण २२ प्रवाशी होते. दोन तासांपासून हे विमान रडारवरून बेपत्ता झालं आहे, याबाबतची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे. संबंधित विमानाचा संपर्क तुटल्यानंतर खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने बेपत्ता विमानाचा शोध घेतला जात आहे. बेपत्ता झालेल्या विमानात ४ भारतीय नागरिकांसह दोन इतर परदेशी नागरिक आहेत. तर उर्वरित सर्व प्रवाशी हे नेपाळ देशाचे नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तारा एअरच्या ९ एनएईटी ट्विन-इंजिन असलेल्या विमानाने रविवारी सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी उड्डाण घेतलं होतं. उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान रडारमधून गायब झालं आहे. बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी एक खासगी हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं आहे. तसेच नेपाळ पोलिसांनी देखील शोधमोहीम सुरू केली आहे.

railway tc
रेल्वेतून विनातिकीट प्रवास महागात! १ कोटी ४२ लाखांचा दंड वसूल
indigo airlines
विमानात प्रवासी बसले, पण वैमानिकाचा पत्ता नाही; काय घडले नेमके?
Strict action by Railways
पिचकारीबहाद्दरांकडून पाच महिन्‍यांत ७.८१ लाखांचा दंड वसूल; मध्य रेल्वेची कारवाई
accident Nagpur flyover, issue of safety two-wheelers arisen
नागपुरात उड्डाण पुलांवरील सुसाट वाहनांना आवरा! सततच्या अपघातांमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

याबाबत अधिक माहिती देताना नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते विष्णू यांनी सांगितलं की, “२२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान बेपत्ता झालं आहे. विमान बेपत्ता होऊन दोन तास झाले आहेत. अद्याप विमानाचा काहीही थांगपत्ता लागला नाही. शोध सुरू आहे. नेपाळी लष्कर खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने विमानाचा शोध घेत आहे. नेपाळ पोलीस देखील बेपत्ता विमानाचा शोध घेत आहेत.”

या फ्लाइटमध्ये तीन क्रू सदस्य असून कॅप्टन प्रभाकर घिमिरे, फ्लाइट अटेंडंट किस्मी थापा आणि अन्य क्रू मेंबर उत्सव पोखरेल अशी त्यांची नावं आहेत. उड्डाण केल्यानंतर २५ मिनिटांत हे विमान जोमसोमला पोहोचणं अपेक्षित होतं. पण रडारवरून संपर्क तुटल्यानंतर दोन तासांपासून हे विमान बेपत्ता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Plane with 22 aboard missing for 2 hours in nepal including 4 indian citizens search operation started rmm

First published on: 29-05-2022 at 13:18 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×