पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग गुरुवारी सलग पाचव्यांदा आसाममधून राज्यसभेवर निवडून आले. येत्या १४ जून रोजी त्यांचे राज्यसभेचे सदस्यत्व संपुष्टात येणार होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी गेल्या १५ मे रोजी आसाममधून कॉंग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्याचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. डॉ. सिंग हे सध्या थायलंडच्या दौऱयावर आहेत.