PM Modi and Xi jinping meet today India-China Relations : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्यात होणाऱ्या भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लादल्याने भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध तणावाचे बनले आहेत. यादरम्यान भारत आणि चीन यांच्यातील संबध हळूहळू सुधारताना पाहायला मिळत आहेत. पूर्वेकडील लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर ५ वर्ष लष्करी तणावर राहिल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याकडे वाचचाल होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्थानिक वेळेनुसार रविवारी दुपारी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. बिजिंगपासून १२० किमी अंतरावर असलेल्या तियानजिन येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO)ची शिखर परिषद होणार आहे, त्यापूर्वी हे दोन नेते एकमेकाशी भेटणार आहेत.

या दोन नेत्यांची ही गेल्या १० महिन्यांत दुसरी भेट असणार आहे. गेल्या सात वर्षात यापूर्वी मोदी आणि जिनपिंग हे BRICS शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर रशियामधील शहर कझान येथे ऑक्टोबर २०२४ मध्ये भेटले होते. दरम्यान या भेटीतून दिसून येत आहे की, दोन्ही बाजू द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी देण्यावर भर देणार आहेत.

दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेसाठी ४० मिनिटांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. एका वरिष्ठ चिनी राजनैतिक अधिकाऱ्याने इंडिनय एक्सप्रेसशी बोलतानात त्यांना एका फलदायी बैठकीची आशा असल्याचे सांगितले.

या भेटीदरम्यान दोन्ही नेते दोन्ही देशांमधील पक्षीय संबंधांच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांच्या कॅलेंडरवर त्यांची मंजूरी देतील अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तानजिन येथे जापानहून दाखल झाले आहे. गेल्या सात वर्षात हा त्यांचा पहिलाच चीन दौरा आहे. पंतप्रधान मोदी ३१ ते १ सप्टेबर या कालावधीत होणाऱ्या एससीओ परिषदेसाठी चीन येथे दाखल झाले आहेत.

मोदी यांन एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटले की, चीनच्या तियानजिन येथे पोहचलो आहे. एससीओ शिखर परिषदेत चर्चा आणि विविध जागतीक नेत्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. तसेच त्यांनी असेही स्पष्ट केले की त्यांचे लक्ष हे बहुराष्ट्रीय शिखर परिषदेवर होते.

भारताचे अधिकारी शी जिनपिंग यांच्याबरोबरच्या बैठक ही द्विपक्षीय बैठकीच्या स्वरूपात पाहिली जाण्याबाबत देखील सावध राहिले आहेत. नवी दिल्लीसाठी हा एक बहुराष्ट्रीय शिखर परिषदेसाठीचा दौरा आहे आणि यादरम्यान यजमान देशाच्या नेत्याबरोबर द्विपक्षीय बैठक ही असामान्य बाब नाही.

मात्र जागतिक परिस्थिती, खासकरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारतावर लादण्यात आलेल्या ५० टक्के टॅरिफनंतर दिल्ली आणि वॉशिंग्टन यांच्यात तणाव निर्माण झाला आहे, यामुळे दिल्लीची स्थिती कठीण बनली आहे. या पार्श्वभूमीवर भारत-चीन संबंध सुधारण्याची प्रक्रिया पुढे जाताना दिसत आहे.