भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दिवसभरामध्ये एकदाच जेवतात. अर्थात ही माहिती पंतप्रधान मोदींनीच दिली आहे. मात्र आपण असं का करतो यासंदर्भातील मोदींनी सविस्तर माहिती दिली असून दिवसातून एकदाच जेवण्यामागील कारणाचा त्यांची खुलासा केलाय.

नक्की वाचा >> ४ लाख ३५ हजारांचे ४ भाले अन् एकूण खर्च… नीरजच्या प्रशिक्षणासाठी मोदी सरकारने किती खर्च केला माहितीये?

पंतप्रधान मोदींनी समोवारी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना आपल्या घरी ब्रेकफास्टसाठी बोलावलं होतं. यावेळेस त्यांनी ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्रासाठी त्याचा आवडता पदार्थ म्हणजेच चूरमा मेन्यूमध्ये ठेवला होता. जेव्हा पंतप्रधान मोदींनाही नीरजने चुरमा खाण्यासाठी आग्रह केला. तुम्हालाही माझ्यासोबत चूरमा खावा लागेल असं म्हणत त्यांना चूरमा खाण्यासाठी आग्रह केला. मात्र त्यावेळी मोदींनी नीरजला नकार दिला. सध्या चातुर्मास सुरु असून या कालावधीमध्ये मी दिवसातून एकदाच जेवतो असं मोदींनी नीरजला सांगितलं.

नक्की वाचा >> करोनाने लावला मोदींच्या लोकप्रियतेला सुरुंग; ६६ टक्क्यांवरुन थेट २४ टक्क्यांवर घसरण

नक्की पाहा >> प्रेस कॉन्फरन्स झाली तालिबानची अन् ट्रोल होतायत मोदी; जाणून घ्या नक्की प्रकरण काय?

सध्या चातुर्मास सुरु असून प्रामुख्याने जैन धर्मातील लोकांमध्ये या कालावधीत खाण्यासंदर्भातील कठोर नियम पाळले जातात. चातुर्मासामध्ये हिंदू धर्मामध्येही अनेक धार्मिक विधी केले जातात. या कालावधीमध्ये शरीरामधील दाहकता वाढवणाऱ्या, पित्त वाढवणाऱ्या भाज्या खाल्ल्या जात नाहीत. अनेकजण पावसाळी वातावरण आणि सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन दिवसातून एकच वेळ जेवण घेतात. पंतप्रधान मोदीसुद्धा चातुर्मासामध्ये एकाच वेळेचं जेवण करतात. मोदींनी नीरजला हे सांगतानाची दृष्य कार्यक्रमाच्या व्हिडीओमध्ये आहेत.

नक्की वाचा >> नीरज चोप्राचं पंतप्रधान मोदींबद्दलचं दोन वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट झालं व्हायरल; म्हणाला होता, “ऐतिहासिक…”

नक्की वाचा >> टोक्योला जाण्यापूर्वीच बहिणीचा मृत्यू, आईने लपवून ठेवली बातमी; मायदेशी परतल्यानंतर ‘ती’ विमानतळावरच ढसाढसा रडली

पंतप्रधान मोदी चातुर्मासासोबतच नवरात्रीच्या कालावधीमध्येही उपवास करतात. नवरात्रीमध्ये पंतप्रधान मोदी निवडक पदार्थांना आपल्या आहारामध्ये स्थान देतात. नरेंद्र मोदी हे गेल्या ३२ वर्षांपासून नवरात्रीचे उपवास करतात. पहिल्या दिवशी देवीची पूजा केल्यानंतर ते नऊ दिवसांच्या उपवास करतात. इतके कडक उपवास असूनही ते कामाचा व्याप कसा सांभाळतात, असा प्रश्न साहजिकच अनेकांना पडतो. मात्र, मोदी गेल्या अनेक वर्षांपासून अशाप्रकारे उपवास करत असल्यामुळे त्यांना विशेष त्रास जाणवत नाही.

दसऱ्याच्या दिवशी ते शस्त्रांची पूजाही करतात. २००१ ते २०१४ या काळात गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी असताना मोदी नेहमी आपल्या सुरक्षा रक्षकांसोबत शस्त्रांची पूजा करायचे. याशिवाय, गोरखपूर येथील मठाचे अधिपती असणारे योगी आदित्यनाथही नवरात्रीत उपवास करतात. हे दोन्ही नेते भाजपामधील प्रमुख नेत्यांपैकी आहेत हे विशेष.