पंतप्रधान मोदींच्या हस्ते केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक; देवस्थानाला ४०० कोटींच्या विकास प्रकल्पांची देणार भेट

मोदींच्या हस्ते आदी शंकराचार्यांच्या प्रतिमेचंही अनावरण केलं जाणार आहे. मंदिराला फुलांची विशेष सजावट करण्यात आलीय

PM Modi In Kedarnath
पंतप्रधान मोदींनी घेतलं केदारनाथचं दर्शन (फोटो ट्विटरवरुन साभार)

दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे केदारनाथ मंदिरात पोहचले आहेत. पंतप्रधान मोदींनी यावेळी रुद्राभिषेक करत भक्तीभावाने बाबा केदारनाथांची पुजा केली. केदारनाथाच्या मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर ते २५० कोटींच्या केदारपुरी पुनर्विकास योजनांचं उद्घाटन करणार आहेत.

केदारनाथच्या या दौऱ्याच्या निमित्ताने मोदी एका महिन्यामध्ये दुसऱ्यांदा उत्तराखंडला गेले आहेत. मोदी आज ज्या योजनांची घोषणा करणार आहे त्यामध्ये आदि गुरु शंकराचार्यांच्या समाधीसंदर्भातील योजनांचाही समावेश आहे. मोदींच्या हस्ते आदि गुरु शंकराचार्यांच्या प्रतिमेचंही अनावरण केलं जाणार आहे.

मोदी यांच्या हस्ते केदारपुरी पुनर्विकासच्या दुसऱ्या टप्प्यामधील प्रकल्पांचे भूमिपूजन केलं जाणार असल्यांचही सांगण्यात येत आहे. या योजना १५० कोटी रुपयांच्या आहेत. २०१४ साली पंतप्रधान झाल्यानंतर मोदी अनेकदा केदारनाथला आले आहेत. मागील वर्षी करोनामुळे ते केदारनाथला गेले नव्हते.

मात्र आता करोना परिस्थिती नियंत्रणामध्ये आल्यानंतर ते पुन्हा एकदा केदारनाथच्या दर्शनाला गेले आहेत. मोदी केदारपुरी पुन:निर्माण प्रकल्पांमध्ये स्वत: अनेक गोष्टींकडे लक्ष देऊन आहेत. ६ नोव्हेंबरपासून हिवाळ्यामुळे केदारनाथचे कपाट बंद होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

केदारनाथ मंदिराचे पुजारी बागीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदीजी महा रुद्राभिषेक करणार असून राष्ट्र कल्याणासाठी प्रार्थना करणार आहे. मोदींच्या हस्ते आदी शंकराचार्यांच्या प्रतिमेचंही अनावरण केलं जाणार आहे. मंदिराला फुलांची विशेष सजावट करण्यात आलीय, असंही पुजाऱ्यांनी सांगितलं.

कालच जम्मू-काश्मीरमधील राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये पंतप्रधान मोदींनी दिवाळीनिमित्त भारतीय लष्करामधील जवानांची भेट घेतली. सैनिकांना ‘भारत मातेचे’चे ‘सुरक्षा कवच’ म्हणत त्यांनी देशाच्या सीमांचे अथकपणे रक्षण केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. मोदी म्हणाले की जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात. त्यामुळेच संपूर्ण देश सुखाची झोप घेऊ शकतो. जवानांमुळेच देशात शांतता आणि सुरक्षितता आहे. जवान त्याग आणि शौर्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत, असे गौरवोद्गागारही त्यांनी जवानांशी संवाद साधताना काढले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm modi in kedarnath today to inaugurate projects worth rs 400 crore scsg

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या