पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केलं. यावेळी अफगाणिस्तान आणि करोना या दोन मुद्द्यांवर त्यांनी जोर दिला. त्याचबरोबर पाकिस्तानचं नाव न घेता टीकास्त्र सोडलं. दहशतवाद जगावरचं संकट आहे. “अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर होऊ नये. यासाठी आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. तिथल्या परिस्थितींचा फायदा कुणी आपल्या फायद्यासाठी उचलू नये. यावेळेस अफगाणिस्तानची जनता, महिला, मुलांना आपली गरज आहे. आपल्याला आपलं कर्तव्य बजावावं लागेल.”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र महासभेतील ७६ व्या सत्राला संबोधित केलं. तसेच करोना आणि भारताला स्वतंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. मागच्या वर्षी महासभेचं सत्र करोनामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.
“दूषित पाणी ही संपूर्ण जगाची समस्या आहे. या समस्येला तोंड देण्यासाठी आम्ही १७ कोटी घरांना पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहोत. जगातील मोठ्या देशात अनेक लोकांना जमीन आणि घरांचे मालमत्ता अधिकार नाहीत. आज आम्ही सहा लाखांहून अधिक गावांमध्ये ड्रोनद्वारे मॅपिंग करून कोट्यवधी लोकांचा डिजिटल रेकॉर्ड तयार करत आहोत.मालमत्ता वाद संपवण्यासाठी हा डिजिटल रेकॉर्ड उपयोगी पडेल. आज भारतात ३५० कोटींपेक्षा अधिक व्यवहार होत आहेत.”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
“भारत लसीकरण मोहिमेंतर्गत कोविन अॅपवरून कोट्यवधी लोकांचं लसीकरण करत आहे. सेवा परमो धर्माच्या आधारावर भारत जगाच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे. भारताने जगातील पहिली डीएनए लस तयार केली आहे. ही लस १२ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाऊ शकते. भारताचे वैज्ञानिक एक आरएनए लस करण्यासाठीही प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे भारताने पुन्हा एकदा गरजू देशांना लस देण्यास सुरुवात केली आहे.”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी जगभरातील लस उत्पादकांन भारतात येण्याचं निमंत्रण देत देशात लस करण्याचं आव्हान केलं आहे.
जगासमोर दहशतवादाचा धोका वाढत आहे, वैज्ञानिक दृष्टीकोन, पुरोगामी विचार वाढवणं आवश्यक आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
भारत 'सेवा परमो धर्मा'अंतर्गत लसीकरण करण्यात गुंतलेला आहे. भारताने जगातील पहिली डीएनए आधारित लस तयार केली आहे. यासह, लसीची निर्यात देखील पुन्हा सुरू झाली आहे.
अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशवाद आणि दहशवाद पसरवण्याासाठी होऊ नये. दहशतवादाचा फटका त्यांनाही बसू शकतो. पंतप्रधान मोदींचा संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेतून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.
भारताने जगातील गरजू देशांना लस देण्यास सुरुवात केली आहे. आमच्या जगातील लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना आमंत्रित करत आहे. आमच्या देशात या आणि लस निर्मिती करा.
जेव्हा जेव्हा भारताची प्रगती होते. तेव्हा जगाची प्रगती होते, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं.
मी लोकशाही असलेल्या देशाचं नेतृत्व करत आहे. देशात अनेक भाषा, धर्म आहेत. तरी विविधतेत एकता हे आमचं देशाचं मोठं यश आहे. हे लोकशाहीचं यश आहे. भारताच्या लोकशाहीची ताकद.. रेल्वेस्थानकावर चहा विकाणारा मुलगा आज चौथ्यांदा भारताचा पंतप्रधान म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेत बोलत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनापूर्वी भारतीय समुदायाच्या नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. न्यूयॉर्कमध्ये मोठ्या संख्येनं लोकं हॉटेलबाहेर जमले आहेत. त्यांच्या हातात भारत आणि अमेरिकेचे झेंडे आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा उचलला होता. त्यावर भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तान एक असा देश जिथे दहशतवादी मुक्तपणे संचार करतात. पाकिस्तान स्वत:ला आग विझवणारा देश समजतो. पण प्रत्यक्षात पाकिस्तान आग पसरवणारा देश आहे, अशा शब्दात सुनावलं आहे.