नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर भारतातील सर्वात मोठ्या ड्रोन महोत्वाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी या महोत्सवाचे उद्धाटन करण्यात येणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून किटकनाशकांचा शिडकावा कसा करायचा याचे प्रात्यक्षिक या महोत्सवात दाखवण्यात येणार आहे. हा महोत्सव दोन दिवसांचा असून तो २७ आणि २८ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.

१६०० हून अधिक लोकांचा सहभाग
या महोत्सवात ७० हून अधिक प्रदर्शक ड्रोनच्या विविध वापराचे प्रकार दाखवणार आहेत. सरकारी अधिकारी, सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल,खाजगी कंपन्या आणि ड्रोन स्टार्टअप्ससह १६०० हून अधिक प्रतिनिधी या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ड्रोन चालवणाऱ्या शेतकऱ्यांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रोन चालवणाऱ्या शेतकऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. या महोत्सवात ७० हून अधिक प्रदर्शने भरवण्यात येणार असून यामध्ये ड्रोनच्या विविध उपयोगांबाबत माहिती दिली जाणार आहे. या महोत्सवात डिजिटल माध्यमातून ड्रोन पायलट प्रमाणपत्रांचे वितरण, उत्पादनांचे उद्घाटन, पॅनल चर्चा, ऑपरेशन्स दाखविण्यात येणार असून मेड इन इंडिया ड्रोन टॅक्सीची प्रतिकृतीही दाखविण्यात येणार आहे.