जगभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत होत आहे. प्रत्येकजण आपल्या जवळच्या व्यक्तींना हे नवं वर्ष आनंदी आणि आरोग्यदायी जावं अशा सदिच्छा देत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नव्या वर्षातील पहिलं ट्वीट करत देशवासीयांसाठी हे वर्ष आनंदाचं ठरावं अशा सदिच्छा दिल्या. याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही ट्वीट करत नववर्षाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “२०२३ हे नवं वर्ष आनंद, यश आणि आशा देणारं ठरावं. या वर्षात प्रत्येकाला चांगलं आरोग्य मिळो.”

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, “देशातील आणि देशाबाहेर राहणाऱ्या सर्व देशवासीयांना नव्या वर्षाच्या आनंदी सदिच्छा. हे २०२३ वर्ष आपल्या आयुष्यात प्रोत्साहन, लक्ष्य आणि यश घेऊन यावं. चला आपण सर्वजण देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी आणि सर्वसमावेशक विकासासाठी कटिबद्ध होऊयात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान आणि राष्ट्रपतींशिवाय अनेक मंत्री आणि राजकीय नेत्यांनी या नव्या वर्षानिमित्त आपले सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.