पीटीआय, जुनागढ

मणिपूर बऱ्याच काळापासून संकटात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या हिंसाचारग्रस्त राज्याचा दौरा आता ‘मोठी गोष्ट’ राहिलेली नाही तर ‘मतचोरी’ हाच देशासमोरील मुख्य मुद्दा आहे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले. ते गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातील केशोड विमानतळाबाहेर माध्यमांशी बोलत होते. त्यांनी हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणुका चोरल्या. आम्ही अलीकडेच कर्नाटकमध्ये ते सिद्ध केले. म्हणूनच मुख्य मुद्दा ‘मतचोरी’ आहे. तसेच आता लोक सर्वत्र ‘मतचोर’ अशी घोषणा देत असल्याचा दावाही त्यांनी केला.

पंतप्रधान मोदींच्या मणिपूर भेटीबद्दल माध्यम प्रतिनिधींनी गांधी यांची प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी अशांत ईशान्येकडील राज्याच्या भेटीला पंतप्रधानांनी कमी लेखण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला. मणिपूर बऱ्याच कालावधीपासून संकटाचा सामना करीत असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी १३ सप्टेंबर रोजी मणिपूरला भेट देणार असून दोन वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या जातीय हिंसाचारानंतर त्यांचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे.