पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील गलवान खोऱ्यात शहीद झालेल्य भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी डिवचलं तर आम्ही देखील जसाश तसं उत्तर देण्यास सक्षम आहोत अशा शब्दांत चीनला ठणकावलं आहे. “भारताला शांतता हवी आहे याबद्दल कोणालाही शंका असण्याचं कारण नाही. पण डिवचलं तर वेळ आल्यावर भारत उत्तर देण्यात सक्षम आहे,” असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आम्ही नेहमीच आपल्या शेजारी राष्टांसोबत आणि मैत्रीपूर्ण पद्दतीने काम केलं आहे. नेहमी त्यांच्या विकासासाठी प्रार्थना केली आहे. अनेकदा आमच्यात मतभेदही झाले आहेत. पण मतभेद वाद होऊ नयेत यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न केले आहेत. आम्ही कधीच कोणाला डिवचत नाही. पण आपल्या देशाच्या अखंडता आणि सार्वभौमत्वासोबत आम्ही तडजोड करत नाही. जेव्हा कधी वेळ आली आहे आम्ही देशाची देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलं आहे. आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. त्याग आपल्या राष्ट्रीय चरित्राचा भाग आहे. विक्रम आणि शौर्य आपल्या देशाच्या चारित्र्याचा भाग आहे,” असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही – नरेंद्र मोदी

“भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही असा विश्वास मला देशवासियांना द्यायचा आहे. आपल्यासाठी भारताची अखंडता आणि सार्वभौमत्व सर्वोच्च आहे. यासाठी त्याची रक्षा करण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. भारताला शांतता हवी आहे याबद्दल कोणालाही शंका असण्याचं कारण नाही. पण डिवचलं तर वेळ आल्यावर भारत उत्तर देण्यात सक्षम आहे,” असं सांगत नरेंद्र मोदींनी यावेळी चीनला ठणकावलं. आपले जवान मारता मारता शहीद झाले आहेत याचा देशाला अभिमान आहे असंही यावेळी नरेंद्र मोदींनी म्हटलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi on india china face off in ladkah sgy
First published on: 17-06-2020 at 15:55 IST