अयोध्येचा मास्टर प्लान!; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

विजन डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या आहेत. ही बैठक जवळपास ४५ मिनिटं चालली.

PM Modi Ayodhya Meeting
अयोध्येचा मास्टर प्लान!; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा ( फोटो- एएनआय)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अयोध्याच्या विकासासाठी तयार केलेली विजन डॉक्युमेंट्स वर्चुअल मिटींग संपन्न झाली. या बैठकीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह १३ जण उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून तर मंत्री आणि अधिकारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला या बैठकीपासून दूर ठेवणयात आलं होतं. ही बैठक जवळपास ४५ मिनिटं चालली. डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना दिल्या.

उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी अयोध्येत विकास करण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी अयोध्या विकास प्राधिकरणाने मास्टर प्लान तयार केला आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून जवळपास २० हजार कोटी रुपयांची काम करत आहेत.

बैठकीतील मुद्दे

  • अयोध्येतून आध्यात्मिक विकास झाला पाहिजे. युवकांना संस्कार आणि आध्यात्मिक शिक्षणाचे धडे येथून मिळाले पाहीजेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
  • अयोध्येचा विकास मॉडेल वेळेआधी पूर्ण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुचना दिल्या आहेत. त्यासोबत विकासाचं मॉडेल तयार करण्यासाठी ६ महिन्यांपासून अथक परिश्रम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांचं मनोबळ वाढवलं.
  • मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अयोध्येचा विकास वेळेआधी पूर्ण होईल असं आश्वासन दिलं.
  • अयोध्येतील श्रीराम विमानतळालाच्या कामाला आणखी गती दिली जाईल, असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.


“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठकीत मार्गदर्शन केलं. अयोध्येत भव्य राममंदिरासह विकास करण्यावर जोर देण्यात आला. विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. मंदिर निर्माणासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक होणार आहे”, असं उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितलं.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pm narendra modi virtual review meeting of ayodhya development rmt