राज्यातील तरुणींवर होणारे अत्याचार कमी करण्याची उपाय योजना म्हणून मध्य प्रदेश पोलिसांनी नवीन शक्कल लढवली आहे. मध्य प्रदेशातील पोलिसांनी तरुणींना संरक्षणाची हमी देण्यासाठी ‘सेल्फी विथ ठाणेदार’ हा नवा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाद्वारे तरुणी आपल्या जवळच्या पोलीस स्थानकाच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत फोटो काढून तो ‘टी आय मेर भाई’ या टॅगसोबत सोशल मीडियावर अपलोड करु शकतात.
पोलिसांनी राज्यातील तरुणींना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर तरुणींने पोलिसांच्या सेल्फी विथ ठाणेदार या उपक्रमाला पसंती दिली आहे. परिणामी, पोलिसांनी सुरु केलेल्या या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून अनेक तरुणी या उपक्रमात उस्फुर्तपणे सहभागी होताना दिसत आहेत. पोलिसांच्या या उपक्रमामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर आळा बसायला मदत होईल. तसेच इतर ठिकाणी वावरताना देखील तरुणीकडे पाहण्याचाच टवाळखोरांचा दृष्टिकोन बदलू शकतो, असा मध्य प्रदेश पोलिसांचा कयास आहे.
देशात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना सुरक्षा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या अनुषगाने सरकारने स्त्रियांच्या बाबतीत काही महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे स्त्रियांवरील अत्याचाराविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण. एवढेच नाही तर पंतप्रधान मोदींनी ‘सेल्फी विथ डॉटर’ या उपक्रमाच्या माध्यमातून स्त्रियांना सन्मान देणारा उपक्रम राबविला होता. या उपक्रमालाही जोरदार प्रतिसाद मिळाला होता.
Hoshingabad(MP): Police ask women to take selfies with Thana Incharge & use it as profile pictures to deter stalkers
Hoshingabad(MP): Police ask women to take selfies with Thana Incharge & use it as profile pictures to deter stalkers pic.twitter.com/J9z4qo2vqY
— ANI (@ANI_news) September 16, 2016